सार

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन या सिनेमाच्या बऱ्याच काळ चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तर आता स्वतः कार्तिक आर्यनने चित्रपटाबाबत मोठी माहिती दिली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन या सिनेमाच्या बऱ्याच काळ चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तर आता स्वतः कार्तिक आर्यनने चित्रपटाबाबत मोठी माहिती दिली आहे. या चित्रपटात कधीही हार न मानणाऱ्या एका खेळाडूची गोष्ट पाहायला मिळणार आहे.आता या सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली.

View post on Instagram
 

 

कार्तिकने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये चंदूच्या हातात बंदूक दिसत असून तो युद्धभूमीवर लढताना दिसत आहे. या पोस्टरवरून एक खेळाडूसह तो कर्तव्यदक्ष सैनिक देखील असल्याचे दिसून येत आहे. एक सैनिक आणि एक खेळाडू असा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे सर्व पोस्टरच्या माध्यमातून दिसून येत आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कार्तिक आर्यनने स्वतः पोस्ट शेअर करत ट्रेलर प्रदर्शनाची माहिती दिली आहे. तसेच त्याने या पोस्ट वर सुंदर कॅप्शन देखील दिले आहे ते असे, माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधील सगळ्यात गौरवाचा क्षण "चंदू चॅम्पियन" चित्रपट आहे. आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक; गौरवशाली भारतीय सेनेतील एका सैनिकाची भूमिका मी साकारत आहे. 8 मिनिटांच्या सिंगल टेक युद्धाच्या शूटिंगमधील सिक्वेन्सची एक झलक दाखावत त्याने भारतीय सैन्याला माझा सलाम म्हंटल आहे.

कार्तिकने शेअर केले आहे की त्याने युद्धाच्या सिनचा शूट सिंगल टेक मध्ये केला आहे. याविषयी त्याच्या पोस्ट वर अनेकांनी कंमेंट करत त्याला यावर प्रश्न विचारले आहेत. तर अनेकांना त्याच्या चंदू चॅम्पियन पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा :

Health Update : राखी सावंतला आहेत हे भयानक आजार, जाणून घ्या सध्याची स्थिती

मिर्झापूर सिझन 3 कधी होणार रिलीज ? पंकज त्रिपाठीपासून अली फजलपर्यंत सगळ्यांनाच प्रश्न

Aishwarya Rai च्या हाताला दुखापत तरीही स्टाइलने वाढवली रंगत, Cannes मधील अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा