सार
हॉलिवूडमधील कपल जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक दोघेजण लग्नाच्या दोन वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त होत आहेत. जेनिफरने कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. पण जेनिफर वकिलाशिवाय घटस्फोट का घेतेय याचे कारण समोर आले आहे.
Jennifer Lopez-Ben Affleck Divorce : जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक हॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. पण लग्नाच्या दोन वर्षातच कपलने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेनिफर आणि बेन एफ्लेकने वकिलाशिवाय घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. खरंतर, गेल्या काही काळापासून दोघे विभक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. इक्विटेबल मीडिएशनचे रिलेशनशिप एक्सपर्ट्स जो आणि चेरिन यांनी द मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, युनाइटेड स्टेट्समध्ये घटस्फोट घेण्यासाठी वकिलाची गरज नसते.
अमेरिकेत घटस्फोटासाठी वकिलाची गरज नाही
बहुतांशजणांना माहिती नाही की, अमेरिकेत घटस्फोट घेण्यासाठी वकिलाची गरज भासत नसल्याचे जो आणि चेरिल यांनी म्हटले. दरम्यान, काहीजण वकील निवडतात. पण वकिलाशिवाय अर्ज दाखल करणे देखील कपलला एक पर्याय असतो. मुलाखतीत असेही सांगितले की, जेनिफरला पुढील कायदेशीर प्रक्रियेची गरज भासणार नसल्याने तिने घटस्फोटासाठी वकील नेमला नाही. घटस्फोट घेणे हा जेनिफर आणि बेनचा निर्णय आहे.
दोन वर्षांआधी लग्न
जेनिफर आणि बेनने दोन वर्षांपूर्वी वर्ष 2022 मध्ये लग्न केले होते. असे सांगितले जाते की, दोघांनी दोनदा लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, पहिले लग्न जुलै 2022 मध्ये लास वेगास आणि दुसऱ्यांदा लग्न ऑगस्ट 2022 मध्ये जॉर्जियामध्ये केले. यानंतर दोघांनी 20 ऑगस्टला जॉर्जियात ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. जेनिफर आपला पती बेनची एक्स गर्लफ्रेंड देखील होती. दोघांनी वर्ष 2001 ते 2002 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.
विभक्त होण्याचे कारण काय?
टीएमजेडच्या रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने आपल्या आर्थिक समस्येमुळे बेनसोबतच्या घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. ब्रेनने ब्रेंटवुटमध्ये घर खरेदी केले आहे. याशिवाय जेनिफर सध्या नव्या घराच्या शोधात आहे. जेनिफर लोपेजचा हा चौथा घटस्फोट आहे. जेनिफरचे पहिले लग्न वर्ष 1997 मध्ये ओजानी नोआसोबत झाले होते. दरम्यान, जेनिफर आणि ओजानीचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनी वर्ष 1998 मध्ये घटस्फोट घेतला. दुसरे लग्न वर्ष 2001 मध्ये मार्क एथंनीसोबत झाले. पण वर्ष 2003 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर वर्ष 2004 मध्ये पुन्हा मार्क एथंनीसोबत लग्न केले आणि 10 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त झाले.
आणखी वाचा :
Salman Khan चे रशीने हातपाय बांधून फेकले होते विहिरीत, पण का?
थलापति विजयकडून अखेर 'तमिलगा वेत्तरी कझगम' पक्षाच्या झेंड्याचे अनावरण