धर्मेंद्र किती संपत्तीचे आहेत मालक, आकडा वाचून म्हणाल कुबेराचं धन सापडलं
अभिनेते धर्मेंद्र सध्या हॉस्पिटलमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एका छोट्या गावातून येऊन बॉलिवूडचा सुपरहिरो बनलेल्या धर्मेंद्र यांनी संघर्षातून सुमारे ४५० कोटींची संपत्ती कमावली आहे.

धर्मेंद्र किती संपत्तीचे आहेत मालक, आकडा वाचून म्हणाल कुबेराचं धन सापडलं
धर्मेंद्र यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मुलगी ईशाने दिली. त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर निगराणी ठेवून आहेत.
एका छोट्या गावातून येऊन झाला बॉलिवूडचा सुपरहिरो
एका छोट्या गावातून पुढं येऊन धर्मेंद्र हे सुपरहिरो झाले. एक काळ त्यांनी जीवनात असा पाहिला की त्यावेळी त्यांना जेवणासाठी खिशात पैसे नव्हते, पण आता संघर्ष करून ते इथपर्यंत पोहचले आहेत.
त्यांच्याकडे किती आहे संपत्ती?
धर्मेंद्र यांच्याकडे किती संपत्ती आहे ते आपण जाणून घेऊयात. ते जवळपास ४५० कोटींच्या संपत्तीचे मालक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांचे जवळपास १०० कोटींचे फार्महाउस असून त्याची झलक ते सोशल मीडियावर दाखवत असतात.
मुंबई आणि लोणावळ्यात अनेक प्रॉपर्टी
मुंबई आणि लोणावळ्यात धर्मेंद्र यांच्या अनेक प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ सारख्या अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. धर्मेंद्र यांचे जवळपास १४ एकरवर वसलेले एक रिसॉर्ट आहे.
धर्मेंद्र कोणासोबत राहायचे?
धर्मेंद्र हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांच्यासोबत शेवटच्या काळात राहत नव्हते. ते त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत शेवटच्या काळात राहायचे. त्यांना एकूण ५ मुले असून सनी देओल हा सर्वात मोठा मुलगा आहे.

