ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मुलगी ईशा देओलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मुलगी ईशा देओलने याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात सुमारे ११ दिवस दाखल करण्यात आले होते आणि सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची बातमी समोर आली.

धर्मेंद्र यांना होत होता त्रास

धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात आणण्यात आले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी असेही म्हणण्यात आले होते की ते नियमित तपासणीसाठी तिथे गेले होते आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.

Scroll to load tweet…

गोविंदा हॉस्पिटलमध्ये झाला दाखल

अभिनेता गोविंदा हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. याआधी शाहरुख खान, सलमान खान आणि अमिषा पटेल हे हॉस्पिटलमध्ये आले. धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी १९६० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आजही ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे आणि बरीच संपत्ती जमवली आहे.

हेमा मालिनी यांनी केलं होतं अवाहन

हेमा मालिनी याणी सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला होता आणि त्यामध्ये त्यांनी खासकरून प्रेक्षकांचे आभार मानले होते. त्यांनी म्हटलं होतं की, धरमजी यांच्याबद्दल काळजी व्यक्त करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, जे सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आपण सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करण्याची विनंती करत असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.