सार

धर्मेंद्र आणि हेमा मालिकी यांच्या लव्ह स्टोरीसह त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांच्या पालनपोषणाचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. ईशाने सांगितले होते की, धर्मेंद्र यांना मुलींनी वेस्टर्न आउटफिट्स परिधान करणे पसंत नव्हते.

Entertainment : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लव्ह स्टोरीचे किस्से बी-टाउनमध्ये नेहमीच चर्चेत राहिले आहे. एकत्रित काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नही केले. पण धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. धर्मेंद्र यांना पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट देत हेमा मालिनीसोबत लग्न करु पाहत होते. पण पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. यावर धर्मेंद्र यांनी धर्म बदलून हेमा मालिनींसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांना दोन मुली ईशा आणि अहाना झाल्या. धर्मेंद्र यांनी मुलींना काही गोष्टींसाठी अत्याधिक मोकळीक दिली नव्हती. धर्मेंद्र यांना मुलींनी वेस्टर्न आउटफिट्स परिधान करणे पसंत नव्हते. हेच कारण होते की, धर्मेंद्र हेमा मालिनींच्या घरी जायचे तेव्हा मुली सलवार सूट परिधान करायच्या.

ईशा देओलने सांगितले होते सत्य
ईशा देओलने हेमा मालिनींचे पुस्तक 'हेमा मालिनी: बियोंड द ड्रीम गर्ल' च्या एका चॅप्टरमध्ये आपल्या वडीलांबद्दलचे काही खुलासे केले होते. राम कमल यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या या पुस्तकात ईशाने म्हटले होते की, वडील खूप शिस्तप्रिय आणि कडक होते. आम्हाला त्यांची भीती वाटायची. त्यांना आम्ही वेस्टर्न आउटफिट्स परिधान केलेले अजिबात आवडत नव्गते. घरी आम्ही शॉर्ट्स कपडे परिधान करायचो. पण वडील घरी यायचे तेव्हा ड्रेटिशनल सूट परिधान करत होते. याशिवाय धर्मेंद्र घरी यायचे पण कधीच ते एक रात्र थांबायचे नाही. आम्हाला याचे फार वाईट वाटायचे. पण तरीही आमचे वडीलांसोबतचे नाते उत्तम राहिले आहे.

वडिलांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये एन्ट्री
ईशा देओलने आयुष्यात आई-वडीलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा विचार केला. हेमा मालिनी यांची ईशाच्या करियरला परवानगी होती. पण धर्मेंद्र या विरोधात होते. मुलीने सिनेमांमध्ये काम करू नये असे धर्मेंद्र यांना वाटत होते. ईशाने पहिल्या सिनेमासाठी होकार दिल्यानंतर धर्मेंद्र यांनी ईशासोबत सहा महिने बोलणे बंद केले होते.

वर्ष 2002 मध्ये आला होता पहिला सिनेमा
ईशा देओलचा पहिला सिनेमा वर्ष 2002 मध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' आला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला होता. यानंतर सातत्याने ईशाने सात सिनेमांमध्ये काम केले. तरीही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. यानंतर वर्ष 2004 मध्ये यशराज फिल्म्सच्या 'धूम' सिनेमातून ईशा झळकली होती. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. सिनेमात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, रिमी सेन आणि उदय चोपडा मुख्य भूमिकेत झळकले होते.

अभिनयाला गुडबाय करत केले लग्न
बॉक्स ऑफिसवर सातत्याने फ्लॉप होत असल्याने ईशा देओलने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2012 मध्ये ईशाने बॉयफ्रेंड भरत तख्तानीसोबत लग्न केले. लग्नानंतर ईशाने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. दीर्घकाळाच्या ब्रेकनंतर ईशाने शॉर्ट फिल्म 'केकवॉक' मधून कमबॅक केले होते. सध्या ईशा तेलुगु सिनेमा 'हीरो हीरोइन' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून वर्ष 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

आणखी वाचा : 

तीन महिन्यांच्या मुलासमोरच पतीला केलं किस, कोण आहे ही अभिनेत्री?

शास्रीय संगीतातील Legends ना विद्या बालनची खास आदरांजली, See Pics