लिंग बदललेली अनाया होणार आई, 'या' विचित्र पद्धतीने बाळाला जन्म देणार
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर, जी एक ट्रान्सजेंडर महिला आहे, तिने आई होण्याच्या तिच्या योजनेबद्दल खुलासा केला आहे. तिने लिंग परिवर्तन करण्यापूर्वी तिचे स्पर्म्स फ्रीज केले होते आणि आता सरोगसीच्या मदतीने ती आई बनणार आहे.

लिंग बदललेली अनाया होणार आई, 'या; विचित्र पद्धतीने बाळाला जन्म देणार
माजी क्रिकेटपट्टू संजय बांगर यांची कन्या अनाया बांगर हि कायमच चर्चेत राहत असते. आता ती परत एकदा राईज अँड फॉल या रियालिटी शोमुळे चर्चेत आली आहे.
अनायाने लिंग परिवर्तन केलं
जन्माने मुलगा असलेल्या अनायाने आपलं लिंग परिवर्तन करून घेतलं आहे. आता ती एक ट्रान्सजेंडर महिला झाली असून माध्यमांमध्ये कायम चर्चेत असते.
आई होण्याच्या प्लॅनबद्दल केला खुलासा
आई होण्याच्या प्लॅनबद्दल अनायाने खुलासा केला आहे. तिने आरुष भोलासोबत बोलताना तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासाबद्दल आणि भविष्यात आई होण्याच्या तिच्या स्वप्नाबद्दल सांगितलं.
अनाया काय म्हणाली?
अनाया म्हटली की, ‘माझ्याकडे आई होण्यासाठी दोनच पर्याय आहेत, पहिला म्हणजे बाळ दत्तक घेणं आणि दुसरा म्हणजे हार्मोनल उपचार सुरू करण्यापूर्वी माझे स्पर्म फ्रीज करणं.’
सरोगसीच्या मदतीने आई होणार
अनाया म्हटली की, “मी सरोगसीच्या मदतीने आई होऊ शकते. मी लिंग परिवर्तन करण्यापूर्वीच माझे स्पर्म जमा करून ठेवले होते. कारण, मी गरोदर राहू शकत नाही.”
अनाया बांगर कोण आहे?
अनाया बांगर ही माजी क्रिकेटपट्टू संजय बांगर यांची मुलगी आहे. तीच जन्माच्यावेळी नाव आर्यन बांगर होतं. वयाच्या २३ व्या वर्षी, २०२४ मध्ये तिने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू केली आणि ती ‘आर्यन’वरून ‘अनाया’ झाली.

