Entertainment: मी रोज 'चीट डे' करतो म्हणणारा सलमान 60 व्या वर्षी इतका फिट कसा?
Entertainment: वयाच्या 60 व्या वर्षीही अभिनेता सलमान खान त्याच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. फिटनेससाठी 20% वर्कआऊट आणि 80% डाएट गरजेचं असतं, असं म्हणतात. पण सलमान खान मात्र रोज 'चीट' करतो, असं त्यानंच सांगितलंय.
14

Image Credit : actor salman khan instagram
मी रोज चीट मील घेतो
सलमान खान म्हणाला, "माझ्यासाठी रोजच चीट मील असतं. मी जिममध्ये 20 मिनिटं किंवा एक तास जास्त वर्कआऊट करायला तयार आहे. पण मला जे खायचं आहे, ते मी खातो. मी उकडलेलं अन्न खात नाही."
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : actor salman khan instagram
मी आवश्यक तेवढं प्रोटीन खातो!
तो पुढे म्हणाला, "माझ्या शरीराला जेवढं प्रोटीन हवं, तेवढं मी खातो. जेवण कितीही चविष्ट असो, मी फक्त एक चमचा भात खातो. मी पोळ्यांना हात लावत नाही. मी हेच पथ्य पाळतो. त्या एका चमचा भातासोबत, मला हवं तेवढं प्रोटीन मी खातो."
34
Image Credit : actor salman khan instagram
कडक डाएटपेक्षा डाएटमध्ये सातत्य ठेवणं जास्त महत्त्वाचं
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, रोज कडक डाएट करण्यापेक्षा, डाएटमध्ये सातत्य ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. सलमानच्या फिटनेसचं हेच रहस्य दिसतंय.
44
Image Credit : actor salman khan instagram
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट करा
प्रत्येकालाच सलमान खानसारखं वर्कआऊट किंवा डाएट करणं शक्य होईलच असं नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट करावं. पण ते फक्त एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता, त्यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

