Filmfare Awards 2025 : ७० व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ चे आयोजन गुजरातमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. शाहरुख खान आणि करण जोहर यांनी हा शो होस्ट केला. कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, याची यादीही समोर आली आहे.
Filmfare Awards 2025 : दरवर्षी फिल्मफेअर पुरस्कारांची सर्वजण वाट पाहत असतात. दरम्यान, ७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन शनिवारी मोठ्या थाटामाटात पार पडले. अहमदाबादच्या ईकेए एरिना येथे आयोजित या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख खान आणि करण जोहर यांनी केले. फिल्मफेअर अवॉर्ड २०२५ च्या विजेत्यांची यादीही समोर आली आहे. किरण राव यांच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाचा सर्वाधिक बोलबाला पाहायला मिळाला. या चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सुमारे १३ पुरस्कार मिळाले. चला पाहूया संपूर्ण विजेत्यांची यादी...
फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट - लापता लेडीज
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - किरण राव (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी क्रिटिक्स अवॉर्ड - आय वॉन्ट टू टॉक (शूजित सरकार)
मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) - अभिषेक बच्चन (आय वॉन्ट टू टॉक) आणि कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन)
मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) - आलिया भट्ट (जिगरा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी क्रिटिक्स अवॉर्ड (पुरुष) - राजकुमार राव (श्रीकांत)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी क्रिटिक्स अवॉर्ड (महिला) - प्रतिभा रांटा (लापता लेडीज)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) - रवी किशन (लापता लेडीज)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) - छाया कदम (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) - लक्ष्य (किल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) - नितांशी गोयल (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - कुणाल खेमू (मडगाव एक्सप्रेस)
सर्वोत्कृष्ट संगीत - राम संपत (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट संवाद - स्नेहा देसाई (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट गीत - प्रशांत पांडे, सजनी (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - अरिजित सिंग, सजनी (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - मधुबंती बागची, आज की रात (स्त्री २)
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा - रितेश शाह आणि तुषार शीतल जैन (आय वॉन्ट टू टॉक)
सर्वोत्कृष्ट कथा - आदित्य धर आणि मोनाल ठाकर (आर्टिकल ३७०)
सर्वोत्कृष्ट पटकथा - स्नेहा देसाई (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम - दर्शन जालान (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - बॉस्को-सीझर (तौबा तौबा, बॅड न्यूज)
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स - रिडिफाइन (मुंज्या)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - राम संपत (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन - सुभाष साहू (किल)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन - सीयॉन्ग ओह, परवेझ शेख - (किल)
सर्वोत्कृष्ट संपादन - शिवकुमार व्ही पणिक्कर (किल)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन - मयूर शर्मा (किल)
जीवनगौरव पुरस्कार - श्याम बेनेगल आणि झीनत अमान
आरडी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट - अचिंत ठक्कर (जिगरा)
सिने आयकॉन अवॉर्ड्स
दिलीप कुमार, नूतन, मीना कुमारी, काजोल, श्रीदेवी, अमिताभ बच्चन, जया बच्चन, रमेश सिप्पी, बिमल रॉय, शाहरुख खान, करण जोहर.
फिल्मफेअर अवॉर्ड २०२५ मधील परफॉर्मन्स
फिल्मफेअर अवॉर्ड २०२५ मध्ये अनेक सेलिब्रिटींनी मंचावर शानदार परफॉर्मन्स दिले. अभिषेक बच्चनने दमदार परफॉर्मन्स दिला. त्याने आपला परफॉर्मन्स वडील अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. त्यांच्याशिवाय अक्षय कुमार, अनन्या पांडे, काजोल, क्रिती सेनॉन यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या सादरीकरणाने पुरस्कार सोहळ्याची संध्याकाळ रंगतदार बनवली.
