सार

दीपिका रणवीर दीपफेकचा शिकार झाले आहे. एका जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यात एका सोनोग्राफी चित्र दिसत आहे. या फोटोमध्ये दिसणारे कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे.

रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट आणि नोरा फतेहीच्या डीपफेक व्हिडिओंनंतर आता या यादीत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. लवकरच आई-वडील होणारे रणवीर आणि दीपिकाही डीपफेक्सचे बळी ठरले आहेत. दीपिका आणि रणवीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यात दीपिकाच्या सोनोग्राफीचा फोटो देखील दाखवण्यात आला आहे.

डिपफेक फोटो :

सोशल मीडियावर एका जोडप्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, जो दीपिका आणि रणवीरचा फोटो असल्याचे बोलले जात आहे. चित्रात, एक महिला तिच्या हातात अल्ट्रासाऊंडचा फोटो धरून आहे. तसेच, महिलेने एका मुलाला मिठी मारली आहे. दोघांचेही चेहरे दिसत नाहीत. दोघांनी टोप्या घातल्या आहेत. मुलाच्या टोपीवर बाबा आणि मुलीच्या टोपीवर आई लिहिलेले आहे.याशिवाय मुलीच्या गालावर डिंपलही दिसत आहे. अशा परिस्थितीत, आता सोशल मीडियावर या फोटोबद्दल अफवा पसरली आहे की या फोटोत दुसर कोणी नसून दीपिका-रणवीरचा त्यांच्या होणा-या मुलाचा सोनोग्राफी फोटो आहे.

पोस्ट बद्दल माहिती :

या फोटोबद्दल पुष्टी झाली आहे की हे लोक प्रत्यक्षात दीपिका आणि रणवीर नाहीत. हे चित्र हॅलिम कुकुकचे आहे, ज्याने 13 मे रोजी तिच्या X खात्यावर तिच्या गर्भधारणेची घोषणा केली होती. अलीकडेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबईत एकत्र दिसले. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण या फोटोत दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. दोघेही लवकरच सप्टेंबरमध्ये आई-वडील होणार आहेत.

दीपिकाचे आगामी चित्रपट :

दीपिकाला तिच्या मुलाच्या जन्मापूर्वी तिच्या आगामी सर्व चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करायचे आहे. त्यामुळे दीपिका 'कल्की 2989 एडी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच ती 'सिंघम अगेन'चे शूटिंग पूर्ण करणार आहे.

रणवीर सिंगचे आगामी चित्रपट : 

रणवीर सिंग दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'डॉन 3' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे.

आणखी वाचा :

कंगना राणौतचा "इमर्जंसी" तिसऱ्यांदा पुढे ढकलला , जाणून घ्या कारण

राखी सावंतच्या हेल्थबद्दल एक्स-पती रितेशने दिली मोठी अपडेट, म्हणाला...

दीपिका पदुकोणने या प्रकरणात सगळ्यांना टाकले मागे, हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री