- Home
- Entertainment
- Coolie box office collection day 3 : तिसऱ्या दिवशीही छप्परफाड कमाई, थलायवा बॉक्स ऑफिसवर झिंगाट
Coolie box office collection day 3 : तिसऱ्या दिवशीही छप्परफाड कमाई, थलायवा बॉक्स ऑफिसवर झिंगाट
मुंबई - सुपरस्टार रजनीकांत यांचा कूली हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीपासून चर्चेत आहे. रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचे जबरदस्त प्री-बुकिंगची नोंद केली होती. आता तिनही दिवस रेकॉर्डब्रेक कमाई करुन उच्चांक गाठला आहे.

₹३८.०५ कोटींची निव्वळ कमाई
रजनीकांतचा नवा चित्रपट कुली बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक देत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाची कमाई थांबायचे नाव घेत नाही. दोन दिवसांची शानदार ओपनिंग आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुटीच्या जोरावर कुली ने खरा विकेंड दमदारपणे गाठला. Sacnilk च्या माहितीनुसार, शनिवारी भारतात या चित्रपटाने तब्बल ₹३८.०५ कोटींची निव्वळ कमाई केली.
कुली बॉक्स ऑफिस अपडेट
तीन दिवसांत भारतातील एकूण निव्वळ कमाई ₹१५४.९१ कोटींवर पोहोचली आहे. परदेशातील उत्कृष्ट प्रदर्शनामुळे जागतिक कमाई ₹२५० कोटींच्या वर गेली आहे. शुक्रवारीच कुली ने अजितकुमारच्या गुड बॅड अग्ली ला मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा तामिळ चित्रपट बनण्याचा मान पटकावला. आता या चित्रपटाला तामिळ चित्रपटांच्या सर्वकालीन रेकॉर्ड यादीत वर जाण्याची मोठी संधी आहे.
₹६०० कोटींचा टप्पा गाठू शकतो
जगभरात आतापर्यंत फक्त तीन तामिळ चित्रपटांनी ₹६०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी दोन ( 2.0 आणि जेलर ) मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. तिसरा चित्रपट आहे विजयचा लिओ. कुली च्या कमाईचा वेग पाहता, हा चित्रपट नक्कीच ₹६०० कोटींचा टप्पा गाठू शकतो आणि कदाचित 2.0 ला मागे टाकण्याचीही शक्यता आहे.
नागार्जुनची प्रतिक्रिया
चित्रपटात खलनायक सायमन ची भूमिका साकारणाऱ्या नागार्जुन यांनी यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “आम्हाला आधीपासूनच माहित होतं की आपण एका खास प्रकल्पाचा भाग आहोत. चित्रपटाभोवतीचा उत्साह हे त्याचं लक्षण आहे. माझ्या भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. उत्कृष्ट चित्रपट म्हणजे टीमवर्क, कलाकारांमधील केमिस्ट्री आणि प्रेक्षकांना दीर्घकाळ लक्षात राहील असा अनुभव देणं. सेटपासून ते थिएटरपर्यंत, कुली ही परंपरा आणि नव्याने घडवण्याचा सोहळा आहे. रेकॉर्ड मोडायचेच होते आणि ते मोडलेही.”
आमिरचा कॉमिक रोल
रजनीकांत आणि नागार्जुन व्यतिरिक्त, या चित्रपटात उपेंद्र, श्रुती हासन आणि सौबिन शाहिर यांच्या भूमिका आहेत. तसेच आमिर खानचा एक खास कॅमिओ देखील यात आहे.
