सार

चिन्मय मांडलेकर आणि संपूर्ण कुटुंबाला ट्रोल करण्यात येत आहे.याच कारण म्हणजे नुकताच त्याने पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गप्पांमध्ये मुलाचं नाव जहांगीर असल्याचे बोले होते. यावरून संपूर्ण कुटुंबाला ट्रोलिंगशी सामना करावा लागत आहे

चिन्मय मांडलेकर याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपला जम बसवला तर आहेच पण हिंदी मध्ये देखील तो आता लोकप्रिय झाला आहे. नुकताच एका पॉडकास्ट इंटरव्हिवमध्ये त्याने आपल्या परिवाराबद्दल गप्पा मारल्या. यात त्याने आपल्या मुलाचे नाव जहांगीर असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्यावर सर्वत्र टीका करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ट्रोल करण्यात येत आहे. यावर स्पष्टीकरण म्हणून चिन्मयच्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

View post on Instagram
 

या आठ मिनिटाच्या व्हिडीओमध्ये नेहाने म्हंटले आहे की, नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माझी जात आधी सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. हा व्हिडीओ करण्यामागचं एकच कारण आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. माझे पती, त्यांचं नाव चिन्मय दिपक मांडलेकर त्यांची जात द्वेष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने म्हणजेच चिन्मयने एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर खूप सारं ट्रोलिंगला आम्ही सामोरे जात आहोत. माझे पती हे पब्लिक फिगर आहेत. त्यांचं काम हे रसिक मायबाप पाहतात, ते काम आवडलं तर त्यांना रसिक मायबाप डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की, त्यांनी त्यांची कानउघडणी करावी. कारण कलाकार हा सतत पब्लिक आयमध्ये असतो; जे मान्य आहे. पण सध्या ट्रोलिंग माझ्या पतीच्या कामाबद्दल होतं नाहीये. तर ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरून होतंय.

चिन्मय एक पब्लिक फिगर असल्यामुळे रसिकांना आमच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण आम्ही पालक म्हणून तो आमचा हक्क हे की, माहिती द्यायची की नाही. मी हा व्हिडीओ मुद्दाम एवढ्यासाठी करतेय लोकांना हे आठवण करून द्यायला. की, त्या मुलाला एक आईसुद्धा आहे. जी कलाकार नाहीये. जी पब्लिक आयमध्ये नसते. जी पब्लिक फिगर नाहीये.अनेकदा काय होतं,स्मार्ट फोनवर काही टाइप करताना विसरतो की, पलीकडे एक माणूस ही आणि तुम्ही टाईप केलेलं ते वाचणार आहे. हे फक्त सगळं एखाद्या रोबॉटिक पॉटला फक्त वाचावं लागणार नाहीये. एक माणूस ते वाचलाच जात. ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जातंय, तो एक दहा-अकरा वर्षांचा मुलगा आहे. बरं का ट्रोल होतंय? तर त्याचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ नाव कधी ठेवलं आता सगळंच सांगते. कारण की मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खरंतर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधिल नाहीये. पण मलाच असं वाटलं की, अज्ञानातून हे ट्रोलिंग होतं असेल. तर माझी ही जबाबदारी आहे अज्ञान दूर करावं. म्हणून हा व्हिडीओ केला आहे.

‘जहांगीर’ हे पर्शियन : 

तर माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ ला झाला. २१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. त्या जमशेदी नवरोज दिवशी जन्म झाल्याने त्याचं नाव ‘जहांगीर’ असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणदायी कुटुंब संस्था आहे. अनेक पालक आपल्या मुलाचं नाव अर्थ आवडला आणि अर्थपूर्ण ठेवतात. आता या भारतात असलेले प्रत्येक अक्षय याचं नाव काय त्यांच्या पालकांनी अक्षय कुमारवरून ठेवलं नसेल ना. अक्षय या शब्दाचा अर्थ आवडला असेल.त्यामुळे नाव काय ठेवावं याचा संपूर्ण हक्क आम्हाला पालक म्हणून असावा.

भारत सोडून पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानात जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला :

आज सकाळीच एकाचा मेसेज आला की, तुम्ही हा देश सोडून अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ राहा. ते वाचलं आणि वाईट वाटलं. अनेक लोक सल्ले देतात, ट्रोलर्स काय मनावर घ्यायचं. पण जसं मी मगाशी बोलले मोबाइलच्या पलीकडे एक माणूस वाचत असतो. तसं हे मी नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे एक माणूसच टाईप करतोय. या देशातल्या एका व्यक्तीला, मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा, असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला. याचं मला वाईट वाटलं. परत कोणी मला असला सल्ला देऊन नये. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत.