2,263 चित्रपटांच्या यादीतून "सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन टू नो" FTII विद्यार्थ्यांचा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये लघुपट सिलेक्ट

| Published : Apr 24 2024, 02:29 PM IST / Updated: Apr 24 2024, 05:34 PM IST

FTII PUNE
2,263 चित्रपटांच्या यादीतून "सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन टू नो" FTII विद्यार्थ्यांचा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये लघुपट सिलेक्ट
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

14 मे ते 25 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. ज्यामध्ये देश-विदेशातील अनेक चित्रपटांचा प्रीमियर होणार असून तर यातून उत्कृष्ट चित्रपट आणि लघुपट निवडला जाणार आहे. त्यामुळे FTII विद्यार्थ्यांना यात संधी मिळाल्याने आनंदाची बाब आहे.

 

दरवर्षी लोकांमध्ये उत्सुकता असते कान्स फिल्म फेस्टिव्हलची. तर भारतीयांना उत्सुकता असते ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणता चित्रपट सिलेक्ट झाला त्याची. यंदाच्या वर्षी पुण्यातील FTTI च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाची निवड कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये झाली आहे. या लघु पटाच्या माध्यमातून नक्कीच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. FTII च्या माजी विद्यार्थिनी पायल कपाडिया आणि मैसम अली यांच्या चित्रपटांना कान्स 2024 मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर या प्रतिष्ठित फिल्म इन्स्टिट्यूटचे चार विद्यार्थी फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो' या लघुपटानं 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या 'ला सिनेफ' स्पर्धात्मक विभागात स्थान मिळवलं आहे.14 मे ते 25 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल होणार आहे.

View post on Instagram
 

या चित्रपटात एका वृद्ध महिलेची कथा आहे जी कोंबडा चोरून आपल्या गावात एक संकट ओढवून घेते आणि तिच्या कुटुंबाला वनवासाला जाण्यास भाग पाडते. कान्स फिल्म फेस्टीव्हलची खडतर स्पर्धा लक्षात घेता FTII विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा पराक्रम आहे. जगभरातील फिल्म इन्स्टीट्यूटमधून 2,000 हून अधिक प्रवेशिका सबमिट केल्या गेल्या होत्या.

FTTI ने दिली चांगली बातमी :

एफटीआयआयने आपला आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला हा लघुपट अनेक परदेशी चित्रपटांना टक्कर देणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे निवडक 18 चित्रपटांमध्ये फक्त 1 भारतीय चित्रपट आहे. तेही FTII च्या विद्यार्थ्यांचा त्यामुळे नक्कीच भारतीयांना याचा अभिमान वाटावा अशी बाब आहे. FTII ने लिहिले की, मोठी घोषणा ! आम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की FTII विद्यार्थ्यांचा चित्रपट "सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन टू नो" 77 व्या कान चित्रपट महोत्सवात स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जगभरातील फिल्म स्कूलद्वारे 2,263 प्रवेशांमधून निवडलेल्या 18 लघुपटांपैकी हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.FTII च्या पोस्टनंतर लोक त्यावर कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत. ही शॉर्ट फिल्म कान्समध्ये जिंकेल अशी आशा ही लोकांना आहे.

ऑल वुई इमॅजिन इज लाइट चित्रपटाचा देखील प्रवेश :

एका भारतीय चित्रपटाने 30 वर्षांनंतर कान्स चित्रपट महोत्सवात स्थान मिळवले आहे. ऑल वी इमॅजिन इज लाइट असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे. भारतीयांनाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. गेल्या 77 वर्षांपासून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा दाखवला जात आहे.