Blackout Teaser : 12वी फेल चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत मॅसीचा येतोय नवीन चित्रपट, OTT वर होणार रिलीज

| Published : May 21 2024, 06:48 PM IST

Blackout

सार

ब्लॅक आउट 11:11 प्रॉडक्शनच्या समर्थनासह Jio स्टुडिओने तयार केले आहे. देवांग भावसार या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याचा प्रीमियर 7 जून 2024 पासून JioCinema वर होईल.

 

विक्रांत मॅसीचा १२ फेल चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आणि कमी कमी बजेट चित्रपट असून देखील चांगली कामगिरी केली. आता हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. विक्रांतच्या आगामी OTT चित्रपट ब्लॅकआउटचा टीझर प्रदर्शित झाला आहे. क्राईम आणि थ्रिलरसह चित्रपटात भरपूर कॉमेडी देखील केली गेली आहे.

View post on Instagram
 

या तारखेपासून जिओ सिनेमावर होणार स्ट्रीम :

ब्लॅक आउट 11:11 प्रॉडक्शनच्या समर्थनासह Jio स्टुडिओने तयार केले आहे. देवांग भावसार या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याचा प्रीमियर 7 जून 2024 पासून JioCinema वर होईल. विक्रांतचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ब्लॅकआउटचा अप्रतिम टीझर :

अनिल कपूरच्या पार्श्वभूमी आवाजाने या टीझरची सुरुवात करण्यात आली आहे. आता काळ बदलणार आहे. विक्रांतचे कधीही न पाहिलेले उग्र रूप पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. टीझरसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आता काळाची बाब आहे, पाहू या रात्रीचा राजा कोण आहे."

ब्लॅकआउट पोस्टरमुळे उत्साह वाढला :

ब्लॅकआऊटचे पोस्टर रिलीज होताच विक्रांत मॅसीच्या चाहत्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला होता. यामध्ये मॅसी आणि मौनी रॉय गोंधळलेले दिसले. तर सुनील ग्रोव्हर नेहमीप्रमाणे कॉमेडी लूकमध्ये दिसला, तर तो हातात कुदळ घेऊन हसतमुख पोज देताना दिसला. तर सौरभ घाडगे आणि करण सोनवणे लाल रंगाच्या कारमध्ये बसलेले चकित झालेले दिसतात.एकदंरीत यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि आता टिझर पाहून त्यांची उत्सुकता आता अजूनच शिगेला पोहोचली आहे.

आणखी वाचा :

अभिनयासोबतच इम्रान खानला या गोष्टींचाही शौक, म्हणाला- गेली चार वर्षे मी हे काम केले

‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनची घोषणा, महेश मांजरेकर नाही तर यंदा अभिनेता करणार सूत्रसंचालन