- Home
- Entertainment
- Bigg Boss 19 : टॉप 5 स्पर्धकांच्या लिस्टमध्ये मोठा बदल, मराठी मुलगा कोणत्या क्रमांकावर?
Bigg Boss 19 : टॉप 5 स्पर्धकांच्या लिस्टमध्ये मोठा बदल, मराठी मुलगा कोणत्या क्रमांकावर?
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' सुरू होऊन पाच आठवडे झाले आहेत. तेव्हापासून हा शो चर्चेत आहे. नुकतंच शोच्या 'बिग बॉस तक' या फॅन पेजने पाचव्या आठवड्यातील लोकप्रिय स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे. चला तर मग पाहूया कोणते स्पर्धक टॉपवर आहेत.

अशनुर कौर
कॅप्टन्सी टास्कदरम्यान अशनुर कौरने ज्याप्रकारे फरहाना भट्टला उत्तर दिलं, ते लोकांना खूपच मजेशीर वाटलं. त्यामुळे लोकप्रियतेच्या यादीत तिला पाचवं स्थान मिळालं आहे.
प्रणित मोरे
प्रणित मोरेचं नावही या यादीत आहे. त्याला चौथं स्थान मिळालं आहे. प्रणित मोरेच्या वन लाइन कॉमिक स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत.
गौरव खन्ना
गौरव खन्ना 'बिग बॉस 19' मध्ये गेल्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क जिंकू शकला नाही, पण त्याने लोकांची मनं नक्कीच जिंकली. टास्क हरल्यानंतरच्या त्याच्या स्पीचने लोकांच्या मनात खास जागा बनवली.
बसीर अली
बसीर अलीचं नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलं आहे. आवेज दरबारसोबतच्या भांडणांमुळे बसीर संपूर्ण आठवडाभर चर्चेत राहिला आहे.
अभिषेक बजाज
अभिषेक बजाजला 'बिग बॉस 19' मध्ये लोक खूप पसंत करत आहेत. सर्वात लोकप्रिय स्पर्धकांमध्ये त्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं आहे. तो कॅप्टन झाल्यापासून त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

