सार

आयुष्मान खुरानाने वडोदरा येथे झालेल्या विमेंस प्रीमियर लीग 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात ‘माँ तुझे सलाम’ गाणं सादर केले. त्याने हा परफॉर्मन्स भारत आणि महिलाशक्तीला समर्पित केला आणि त्याच्या हिट गाण्यांनी स्टेडियम गाजवले.

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना याने काल रात्री वडोदरा येथे झालेल्या विमेंस प्रीमियर लीग 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्याने ‘माँ तुझे सलाम’ गाणं सादर करत संपूर्ण स्टेडियमला उत्साहाने भारावून टाकलं आणि भारताची ताकद आणि महिला शक्तीला समर्पित हा परफॉर्मन्स दिला.

आयुष्मानने हृदयाजवळ तिरंगा धरत स्टेडियमभर धावत हा ए.आर. रहमान यांचा आयकॉनिक देशभक्तीपर गीत गायलं. त्याच्या गाण्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच देशप्रेमाचा जोश संचारला!

हा शानदार व्हिडिओ येथे पहा

 

View post on Instagram
 

 

‘माँ तुझे सलाम’ गाणं गाताना, आयुष्मानने हा परफॉर्मन्स भारत आणि महिलाशक्तीला समर्पित केला. तो म्हणाला –“हे गाणं सर्व महिलांसाठी, मातांसाठी आणि आपल्या देशासाठी आहे. WPL हा केवळ एक क्षण नाही, तर तो एक चळवळ आहे. ही लीग केवळ आपल्या देशातील नाही तर संपूर्ण जगभरातील खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. BCCI चे आभार की त्यांनी हा पुढाकार घेतला. आता तरुणांसाठी नवीन आदर्श आहेत, महिला आणि प्रतिभा फक्त एका विशिष्ट लिंगापुरती मर्यादित नसते, ती त्यापलीकडे आहे.”

त्याच्या दमदार गाणं आणि डान्स परफॉर्मन्समध्ये त्याची हिट गाणी – पाणी दा रंग, साडी गली आजा तसेच त्याच्या सुपरहिट डान्स नंबर जेडा नशा चा समावेश होता. आयुष्मानच्या भांगड्या च्या स्टेप्स आणि भावपूर्ण आवाजाने संपूर्ण स्टेडियम उर्जेने झपाटून गेलं आणि WPL च्या उद्घाटन सोहळ्यात धम्माल वातावरण निर्माण झालं!

त्याचा पूर्ण परफॉर्मन्स येथे पाहू शकता