धक्कादायक ! ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदारावर झाले लैंगिक अत्याचार

| Published : May 05 2024, 03:10 PM IST / Updated: May 05 2024, 03:11 PM IST

brittany lauga

सार

ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. वाढदिवसाच्या रात्री पार्टी दरम्यान, ड्रग्स देऊन लैंगिग अत्याचार केल्याचा आरोप या महिला खासदाराने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

 

ऑस्ट्रेलियात एका महिला खासदाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिचा सोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून त्यानंतर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील खासदार असलेल्या या महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळ झाल्याचा दावा केला.वाढदिवसाच्या रात्री पार्टी दरम्यान, त्यांना जबरदस्तीने अंमली पदार्थ देण्यात आले. यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असल्याने एकाच खळबळ उडाली आहे. ब्रिटनी लॉगा असे या महिला खासदाराचे नाव आहे. त्या ऑस्ट्रेलियात सहाय्यक आरोग्य मंत्री आहेत. त्यांचा मतदारसंघ येप्पूनमध्ये असताना त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

View post on Instagram
 

37 वर्षीय ब्रिटनी लॉगा यांनी लैंगिक छळ प्रकरणी २८ एप्रिल रोजी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. टेलिग्राफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील पोलीस अधिक तपास करत आहे. रुग्णालयात केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या शरीरात अंमली पदार्थ असल्याचे आढळले आहे. ब्रिटनी लॉगा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत खुलासा केला आहे. ड्रग्जचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रिटनी लॉगा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले की, ड्रग्जचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम झाला आणि त्यांचा ड्रग्ज देण्यात आलेल्या इतर महिलांशी संपर्क साधला गेला. क्वीन्सलँड पोलिसांनी टेलिग्राफला सांगितले की, ते येप्पूनमधील एका घटनेशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची चौकशी करत आहेत. पण, कोणाला याबाबत अधिक माहिती मिळाल्यास लगेच संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.