'औरों में कहां दम था' आणि 'उलझ' सिनेमाची BO वर टक्कर, वाचा दुसऱ्या दिवसाची कमाई

| Published : Aug 04 2024, 12:31 PM IST

Auron Mein Kahan Dum Tha-Ulajh Box Office Day 2
'औरों में कहां दम था' आणि 'उलझ' सिनेमाची BO वर टक्कर, वाचा दुसऱ्या दिवसाची कमाई
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Auron Mein Kahan Dum Tha Vs Ulajh Box Office Day 2 Collection : बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी दोन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये अजय देवगणचा औरो में दम कहा था सिनेमा असून दुसरा सिनेमा जान्हवी कपूरचा उलझ सिनेमा आहे. दोन्ही सिनेमांची किती कमाई केली जाणून घेऊया.

Auron Mein Kahan Dum Tha Vs Ulajh Box Office Day 2 Collection : अजय देवगणचा ‘औरों मे कहां दम था’ आणि जान्हवी कपूरचा ‘उलझ’ सिनेमा शुक्रवारी (2 ऑगस्ट) प्रदर्शित झाला. या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी टक्कर झाल्याने खास कमाई करता आली नाही. अशातच दोन्ही सिनेमांची दुसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. अजयच्या सिनेमाने दुसऱ्या दिवशी 2.15 कोटी रुपयांची कमाई केली. तर जान्हवीच्या सिनेमाने 1.70 रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.

औरों में कहां दम था सिनेमाचे कलेक्शन
अजय देवगण आणि तब्बू यांच्यामधील नातेसंबंधांची अनोखी कथा मांडणाऱ्या औरों में कहां दम था सिनेमाची रिलीजआधी जोरदार चर्चा सुरू होती. रिलीजनंतर Sacnilk.Com च्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 1.85 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 2.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर दोन दिवसात एकूण 4 कोटी रुपये कमावले आहेत. औरों में कहां दम था सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. सिनेमाचे बजेट 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

उलझ सिनेमाची कमाई
जान्हवी कपूर आणि गुलशन देवैया यांच्या उलझ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाई घसरली गेली. Sacnilk.Com च्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 1.70 कोटी रुपयांची कमाई केली. उलझ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण केवळ 2.85 कोटी रुपयांची आतापर्यंत कमाई केली आहे. ट्रेड एक्सपर्ट्सच्या मते, सिनेमाची रविवारीही प्रेक्षकांवर जादू चालणार नाही. याशिवाय वर्किंग डे दरम्यानही सिनेमाची परिस्थिती बिघडली जाईल. जवळजवळ 50 कोटी रुपयांत तयार करण्यात आलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन सुधांशु सारिया यांनी केले आहे.

 

आणखी वाचा : 

ओपनिंग डे वेळीच जान्हवीच्या Ulajh सिनेमाच्या कमाईत घसरण, वाचा कलेक्शन

Auron Mein Kahan Dum Tha Review : भावूक करणारी अजय-तब्बूची अनोखी लव्ह स्टोरी