- Home
- Entertainment
- Aryan Khan च्या 'The Ba*ds Of Bollywood' वेब सिरिज लॉन्चिंगला कोण कोण उपस्थित होते, बघा PHOTOS
Aryan Khan च्या 'The Ba*ds Of Bollywood' वेब सिरिज लॉन्चिंगला कोण कोण उपस्थित होते, बघा PHOTOS
Aryan Khan : आर्यन खानच्या 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजचा प्रीमियर बुधवारी रात्री मुंबईत पार पडला. यावेळी संपूर्ण बॉलिवूड जमलं होतं. मुकेश अंबानी पत्नी नीतासोबत दिसले. रणबीर कपूर, अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिजचा प्रीमियर
आर्यन खानच्या 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टसोबत आणि अजय देवगण पत्नी काजोलसोबत पोहोचला होता. दोन्ही कपल्सचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला.
शाहरुख खानचं कुटुंब
'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला शाहरुख खान कुटुंबासोबत दिसला. आर्यन खान, गौरी खान, सुहाना खान यावेळी खूपच स्टायलिश दिसत होते.
अंबानी कुटुंबासोबत अमिताभ बच्चनची नात
राधिका मर्चेंट, आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि ईशा अंबानी यांच्यासोबत अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा देखील 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला दिसली.
पत्नीसोबत मुकेश अंबानी
आर्यन खानच्या 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला बिझनेस टायकून मुकेश अंबानी पत्नी नीतासोबत दिसले. या जोडप्याने हसून फोटोग्राफर्सना पोज दिल्या.
पत्नी भावनासोबत चंकी पांडे
'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला चंकी पांडे पत्नी भावनासोबत दिसला. हे जोडपे ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमध्ये दिसले.
आमिर खानची गर्लफ्रेंड
'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटही पोहोचली होती. यावेळी 'जवान' चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटली कुमारही पत्नीसोबत दिसला.
कुटुंबासोबत संजय कपूर
संजय कपूरही कुटुंबासोबत 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला दिसला. त्याने कुटुंबासोबत फोटोग्राफर्सना पोज दिल्या.
मुलांसोबत सलमान खानची बहीण
'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला सलमान खानची बहीण अलविरा अग्निहोत्री तिच्या मुलांसोबत दिसली. यावेळी शनाया कपूरही स्टायलिश लूकमध्ये दिसली.
तमन्ना भाटिया आणि अनन्या पांडे
'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला तमन्ना भाटिया आणि अनन्या पांडेही दिसल्या. दोघींचाही लूक जबरदस्त होता.
कुटुंबासोबत बॉबी देओल
अनिल कपूरही 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला दिसला. तर, बॉबी देओलही कुटुंबासोबत दिसला. सर्वांनी फोटोग्राफर्सना स्टायलिश पोज दिल्या.
पतीसोबत माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षितही पतीसोबत 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला दिसली. हे जोडपे स्टायलिश लूकमध्ये दिसले.

