सार

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता ती अभिनयासोबत राजकारण करताना दिसणार आहे. रुपाली सध्या 'अनुपमा' या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. अभिनेत्रीचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे,. 

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील घराघरात पोहोचलेली अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली हिने नुकताच राजकारणात प्रवेश करत कमळ हाती घेतले आहे. रुपालीसोबत चित्रपट दिग्दर्शक अमय जोशी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमेयने अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या दोघांनी भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट देखील घेतली आहे.

रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्टार प्लसवरील तिची ही मालिका खूप चर्चेत आहे. ती प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने राजकारणात प्रवेश करत संपूर्ण चाहत्यांना धक्का दिला आहे.

रुपालीची कारकीर्द :

रुपाली सध्या 'अनुपमा' या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. या शोमध्ये ती मुख्य पात्र अनुपमाची भूमिका साकारत आहे. चाहत्यांना तिची ही भूमिका खूप पसंतीस उतरली आहे. रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.9 मिलियन म्हणजेच 20 लाखांहून अधिक लोक फॉलोवर आहेत. कालच अभिनेत्रीने तिचा 47 वा वाढदिवस मुंबईत साजरा केला.

रुपाली ही चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी आहे. अभिनेत्रीने वयाच्या 7 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात झाली. वडिलांच्या 'साहेब' या चित्रपटात तिने पहिली भूमिका साकारली. पण रुपालीला 2003 मध्ये आलेल्या 'संजीवनी' या मालिकेतून खरी ओळख मिळाली. यानंतर तिने 'बिग बॉस'च्या सीझन 1 मध्ये देखील सहभाग घेतला होता. रुपाली 'साराभाई व्हर्सेस साराभाई' सारख्या हिट शोचाही भाग आहे. 2013 मध्ये 'परवरिश' ही मालिका केल्यानंतर तिने 7 वर्षांचा ब्रेक घेतला. यानंतर रुपाली 'अनुपमा'सोबत टीव्हीच्या दुनियेत परतली.

रुपालीची पर्सनल लाईफ :

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर रुपालीने 2013 मध्ये बिझनेसमन अश्विन के वर्माशी लग्न केले, या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. रुपाली चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री तसेच थिएटरचा एक भाग आहे. तिने व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केले आहे. रुपालीने सांगितले आहे की तिचे वडील कसे दिवाळखोर झाले, त्यानंतर तिला घर चालवण्यासाठी संघर्ष करावा लागला. विलासी जीवन जगणाऱ्या रुपालीला बस आणि रिक्षाने प्रवास करावा लागत होता. फक्त घरात पैसे आणण्यासाठी अनेक काम तिने केले आहे.