- Home
- Entertainment
- अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची घेतली भेट, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची घेतली भेट, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
पुन्हा शिवाजीराजे भोसले: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या आगामी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचे आमंत्रण दिले आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'चा हा सिक्वेल आहे.

अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी भेट घेतली आहे. मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु त्यापूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडणार आहे.
महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची भेट का घेतली?
अभिनेते महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकर लॉन्च करण्यात येणार असून त्या कार्यक्रमाचे आमंत्रण द्यायला त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली.
२००९ मध्ये आला होता पहिला चित्रपट
२००९ मध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट आला होता. त्याच चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळंच रूप दिसणार
आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिका कोणाची आहे?
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपट कधी रिलीज होणार?
हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षकांना त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळं हा चित्रपट कधी रिलीज होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

