सार
एप्रिल महिन्यात काही नवे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आता हे चित्रपट नेमके कोणते? जाणून घेऊया...
एंटरटेनमेंट डेस्क : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नवीन मराठी चित्रपटांची यादी आली असून एकापेक्षा एक दमदार चित्रपट,मराठी चित्रपट सृष्टी घेऊन येत आहे. यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित "संघर्षायोद्धा" चित्रपट येत आहे. जुनं फर्निचर असे चित्रपट येत आहे. त्यामुळे यंदाच्या सुट्टीत चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
जुनं फर्निचर
महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकरी,मेधा मांजरेकर, डॉ.गिरीश ओक, अनुषा दांडेकर, अलका परब, शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमधून वेगळी स्टोरी आणि चांगला चित्रपट आहे असे देखील बोलले जात आहे.
लेक असावी तर अशी
'माहेरची साडी' या चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा 'लेक असावी तर अशी' हा चित्रपट येणार आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.हा सिनेमा कौटुंबिक असल्याने एकत्र पाहणं तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर विजय कोंडके एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मायलेक
आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' हा चित्रपट वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी पदार्पण करत आहे. हा चित्रपट १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, संजय मोने हे कलाकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा :
प्रिया बापट आणि उमेश कामतचा 'गुलाबी साडी आणि....' गाण्यावरील भन्नाट डान्स व्हायरल (Watch Video)