सार

Crime News : पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवल्याचे वृत्त समोर आले आहे.

 

Crime News : पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर मेट्रो स्टेशनवरून उडी मारून स्वतः आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गुरूग्राम येथे ही घटना घडली आहे. गुरूग्राममधील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने रविवारी पत्नीची हत्या केली. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मेट्रो स्टेशनवरून उडी मारून स्वतःचेही आयुष्य संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले व त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.

सहा महिन्यांपूर्वीच आले होते गुरूग्राममध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील रहिवासी असलेला 30 वर्षीय गौरव शर्मा आणि त्याची पत्नी लक्ष्मी शर्मा (वय 23 वर्ष) आपल्या एक वर्षाच्या मुलासोबत गुरूग्राममधील डीएलएफ कॉलनीमध्ये राहत होते.

सहा महिन्यांपूर्वी त्यांनी येथे भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. रविवारी (31 डिसेंबर 2023) या फ्लॅटमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यावेळेस घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना मुलाची आई मृतावस्थेत आढळली. 

एक वर्षाचे बाळ आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळाले. पोस्टमार्टेम केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

मेट्रो स्टेशनवर केली आत्महत्या

पत्नीची हत्या केल्यानंतर गौरव शर्माने गाझियाबादमधील कौशंबी मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केली.  गौरवच्या कुटुंबीयांना त्याच्या आत्महत्येची माहिती दिली असता, रविवारी पत्नीची हत्या करून तो फरार झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना समजली. 

हत्या आणि आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

गौरवने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली? यामागील ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांना कोणतेही पुरावे हाती लागलेले नाही. गौरवच्या कुटुंबीयांकडूनही माहिती मिळालेली नाही. दरम्यान घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरातील स्थानिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा :

पंजाबमध्ये अर्जुन पुरस्कारप्राप्त पोलीस उपअधीक्षकाची गोळी घालून हत्या, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही गायब

धक्कादायक! महिलेला प्रेग्नेंट करा व 13 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा, लोकांना गंडा घालणारी टोळी गजाआड

धक्कादायक! प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, रेल्वे ट्रॅकवर सापडले तरुणाच्या शरीराचे तुकडे