सार

Crime News : पंजाबमध्ये पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंग देओल यांची गोळ घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या डोक्यावर जखमेच्या खुणा दिसत असून गळ्यामध्ये एक गोळी अडकल्याचंही आढळले.

Crime News : पंजाब जालंधरमधील संगरूर येथे कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंग देओल यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोमवारी (1 जानेवारी 2023) त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर पंजाबमध्ये खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही गायब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह बस्ती बावा खेल कालव्याजवळ आढळला. मृतदेह पाहिल्यानंतर कोणीतरी त्यांची हत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात आली. कारण त्यांच्या डोक्यावरही जखमेच्या खुणा आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा येथील एका ग्रामस्थासोबत वादही झाल्याचेही म्हटले जात आहे.

न्यू ईअर पार्टीनंतर हत्या

पोलीस उपअधीक्षक देओल यांनी 31 डिसेंबर 2023 रोजी मित्रांसोबत पार्टी साजरी केली. पार्टीनंतर मित्रांनी त्यांना संगरूरच्या बसस्थानकाजवळ सोडल्याचे म्हटले जात आहे. पण सोमवारी सकाळी स्थानिकांना देओल यांचा मृतदेह कालव्याजवळ आढळला. याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवली, त्यावेळेस पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

पोलिसांनी मृतदेह तातडीने पोस्टमार्टेमसाठीही पाठवला. रिपोर्टनुसार, त्यांच्या गळ्यात गोळी अडकल्याचे निदर्शनास आले. यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंग देओल यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रस्ते अपघात झाल्याचा होता अंदाज, पण...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने देओल यांचा मृतदेह सापडला होता. त्यानुसार सुरुवातीस रस्ते अपघातामुळे मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवण्यात येत होता. पण डोक्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर अनेक जखमा देखील आढळल्या. पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, देओल यांच्या गळ्याच्या भागात एक गोळी आढळून आली. यावरून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकरणात सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलीस तपासत आहेत सीसीटीव्ही फुटेज

पोलीस उपअधीक्षकांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस स्थानिक बसस्थानक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. जेणेकरून काही पुरावे मिळाल्यास या हत्येमागील कारणे समोर येण्यास मदत मिळू शकेल.

आणखी वाचा :

धक्कादायक! महिलेला प्रेग्नेंट करा व 13 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा, लोकांना गंडा घालणारी टोळी गजाआड

धक्कादायक! प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, रेल्वे ट्रॅकवर सापडले तरुणाच्या शरीराचे तुकडे

NewsClick Case: आरोपी प्रमुख HR अमित चक्रवर्ती सरकारी साक्षीदार होण्यास तयार, कोर्टाकडे मागितली परवानगी