धक्कादायक! प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, रेल्वे ट्रॅकवर सापडले तरुणाच्या शरीराचे तुकडे

| Published : Dec 30 2023, 11:42 AM IST / Updated: Dec 30 2023, 11:51 AM IST

khandwa track

सार

प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर त्याच्या गर्लफ्रेंडचे पाय देखील कापले गेल्याची माहिती आहे.

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्यासोबत पळालेल्या मुलीची अवस्था देखील अतिशय गंभीर आहे. शुक्रवारी रात्री हे दोघंही घरातून अचानक बेपत्ता झाले होते. 

शनिवारी (30 डिसेंबर 2023) सकाळी या दोघांचेही कुटुंबीय पोलीस स्थानकात तक्रार नोंदवणार होते. पण त्यापूर्वी या दोघांबाबत धक्कादायक वृत्त समोर आले आहे आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खंडवा जिल्ह्यातील मथेला रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी एका तरुणाच्या शरीराचे तुकडे सापडले. त्याचे धड, डोके आणि हात सर्व अवयव वेगवेगळ्य स्थितीत आढळले. यावरून ट्रेनच्या जोरदार धडकेमुळे त्याच्या शरीराचे तुकडे झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर मुलीचेही पाय कापले गेले आहेत. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या?

प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शुक्रवारी (29 डिसेंबर 2023) रात्रीपासून हा मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाले होते. सुरुवातीला कुटुंबीयांनी या दोघांचा बराच वेळ शोध घेतला. सकाळपर्यंत काहीही माहिती न मिळाल्याने त्यांनी शनिवारी सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा विचार केला. पण यापूर्वीच दोघांच्या अपघाताची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली.

मुलगी आहे अल्पवयीन

अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या मुलीचे वय केवळ 16 वर्षे आहे. तर मृत पावलेला तरुण प्रौढ असल्याचे सांगितले जात आहे. मुलगी इयत्ता अकरावीमध्ये शिकते. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, याबाबतची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा : 

NewsClick Case: आरोपी प्रमुख HR अमित चक्रवर्ती सरकारी साक्षीदार होण्यास तयार, कोर्टाकडे मागितली परवानगी

US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

Dawood Ibrahim : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय, या दिवशी होणार लिलाव

Thane Crime : पतीने संशयातून पत्नीसह मुलांची केली निर्घृण हत्या, तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं