सार

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने घोडबंदर रोड येथील कासारवडवली गावाजवळ सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्टीतून 90 तरूणांसह पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Thane Rave Party :  नववर्ष सुरू होण्याआधीच ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कासारवडवली (Kasarvadavali) येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकत 90 तरुण आणि पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टीतून एलएसडी, चरस, गांजा, एक्स्टसी गोळ्या आणि दारू जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांना तपासादरम्यान कळले की, या रेव्ह पार्टीचे आयोजन दोन तरूणांनी केले होते. यामधील एक तरूण 19 वर्षांचा असून दुसरा 23 वर्षांचा आहे. हे दोन्ही तरूण कळवा आणि डोंबिवली येथे राहणारे आहेत. 

याशिवाय पोलिसांनी 29 दुचाकी जप्त केल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणांना ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासासाठी नेण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
ठाण्यातील रेव्ह पार्टीवर धाड टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तसंस्थांना याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, "पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर असून कारवाई करत आहेत. एमडी ड्रग्ज रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रग्जमुक्त मुंबईचा आम्ही संकल्प केला असून या विरोधात कठोर कारवाईही केली जात आहे. "

नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर
नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर आहेत. घोडबंदर (Ghodbunder) रोडवरील कासारवडवली गावाजवळ सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 100 जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.

गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात रविवारी (31 डिसेंबर, 2023) छापेमारी करण्यात आली. कासारवडवलीच्या खाडीच्या किनारी रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा :

Mumbai : RBIसह अन्य ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai : शहरात काही ठिकाणी स्फोट होतील...धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर

Mumbai New Year Special Local : नववर्षाच्या मध्यरात्री मुंबईत चालवल्या जाणार स्पेशल लोकल ट्रेन, पाहा वेळापत्रक