टॅक्सी चालकाकडून महिलेची गळा दाबून हत्या, पोलिसांनी अवघ्या 24 तासात असा लावला गुन्ह्याचा छडा

| Published : Apr 30 2024, 07:45 AM IST / Updated: Apr 30 2024, 08:34 AM IST

arrest 3

सार

Crime : रायगड जिल्ह्यातील उरण परिसरात एका महिलेला मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत मिळाला. या संदर्भात अधिक तपास केला असता पूनम क्षीरसागर नावाच्या महिलेचा असल्याचे समोर आले. पूनमची हत्या कशी झाली आणि का केली याचा शोध पोलिसांनी अवघ्या 24 घेतला. 

Crime News : ठाणे येथील नागपाडा परिसरातील टॅक्सी चालकाने महिलेची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. निजाम खान असे आरोपीचे नाव असून मृत महिलेसोबत त्याचे नातेसंबंध होते. पीडित महिलेचे एक्स्ट्रा-अफेअर असल्याच्या संशयावरून आरोपीने महिलेची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पूनम क्षीरसागरचा मृतदेह 25 एप्रिलला उरण परिसरात सापडला. पूनम मानखुर्द येथे राहणारी होती आणि नागपाडा येथे कामाला होते. तर, 18 एप्रिलला पूनम नेहमीप्रमाणे घरून कामासाठी निघाली असता परत घरी आलीच नाही. याबद्दल नोकरीच्या ठिकाणी विचारले असता पूनम संध्याकाळीच निघून गेल्याचे सांगितले. यावर पूनमच्या पालकांनी मानखुर्द पोलीस स्थानकात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

नक्की काय घडले?
25 एप्रिलला, उरणच्या समुद्र किनारपट्टीजवळील अज्ञात ठिकाणी कुजलेला मृतदेह सापडला. याशिवाय मृतदेह पोत्यात असण्यासह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयपीसी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांकडे असलेल्या माहितीनुसार कपडे आणि ब्रेसलेटवरून मृत महिला पूनमच असल्याचे जाणून घेण्यासाठी तिच्या कुटुंबाची भेट घेतली. शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आले असता कळले की, पूनमची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेह नदीत फेकण्यात आला.

तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस
या घटनेत अधिक तपास करत असताना पोलिसांना निजाम खान नावाचा व्यक्ती पूनमचा दररोज मानखुर्द येथून सोबत घेऊन नागपाडाला सोडायचा जेथे ती काम करत होती. आरोपी निजामने घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, 18 एप्रिलला पूनम कामावरून परतल्यानंतर ते दोघे खडवली गेले, जेथे ती बुडाली. पुढे सांगताना निजामने म्हटले की, यानंतर पुनमला शासकीय रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले. यामुळे घाबरलेल्या निजामने पूनमचा मृतदेह उरण येथे फेकून दिल्याचा दावा केला. निजाम खानला उरण पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी निजामची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, पूनमची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह फेकून दिला. याशिवाय पूनमचे एक्स्ट्रा-अफेअर असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला असता निजामने तिची हत्या केली.

आणखी वाचा : 

Crime : खाजगी कंपनीच्या सेवानिवृत्त संचालक महिलेची मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली फसवणूक, आरोपींनी असा घातला कोट्यावधींचा गंडा

Crime : पत्नीच्याच समोर महिलेवर बलात्कार, धर्मांतरणासाठीही बळजबरी; 7 जणांच्या विरोधात FIR दाखल