सार

Crime : मुंबईत एका खासगी कंपनीच्या सेवानिवृत्त संचालक महिलेला तब्बल कोट्यावधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

Mumbai Crime : मुंबईतील एका खासगी कंपनीच्या सेवानिवृत्त संचालक महिलेला कोट्यावधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती देत म्हटले की, आरोपींनी पीडित महिलेला आम्ही पोलीस आणि सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. याशिवाय पीडित महिलेला तिच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) तपास केला जातोय अशी भीतीही दाखवली.

पोलिसांनी पुढे असे म्हटले की, पीडिताने आरोपींना पैसे देण्यासाठी स्वत:सह आपल्या आईचे शेअर आणि म्युचअल फंडातील गुंतवणूक मोडली. एवढेच नव्हे गोल्ड लोनही घेतले.

नक्की काय घडले?
सदर घटना 6 फेब्रुवारी महिन्यानंतरच्या दोन महिन्यांमध्ये घडली आहे. पीडित महिला पश्चिम उपनगरात राहते. महिलेला एक व्हॉट्सअ‍ॅप फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत: ला दूरसंचार विभागातील अधकारी सांगत तुमचे तिन्ही मोबाइल क्रमांक निष्क्रिय केले जातील असे सांगितले. याशिवाय फोन पोलीस अधिकाऱ्यांना कनेक्ट करत असल्याचेही म्हटले. खरंतर, पीडित महिला जेष्ठ नागरिक आहे.

यानंतर आणखी एका व्यक्तीने स्वत: ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पीडित महिलेशी संवाद साधण्यास सुरूवात केली. या व्यक्तीने महिलेला तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची तक्रार मिळाल्याचे सांगितले. खरंतर, आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांकाशीसंबंधित हे प्रकरण असल्याचे सांगण्यात आले.

पुढे व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फोन ट्रान्सफर केला असता त्याने स्वत:ला सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. या व्यक्तीने पीडित महिलेला मनी लॉन्ड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेले पैसे बँक खात्यात जमा करा आणि ते तुम्हाला परत मिळतील असेही आश्वास पीडित महिलेला देण्यात आले.

आरोपींनी अशी केली फसवणूक
आरोपींनी पीडित महिलेच्या नावावर एक बँक खाते सुरू करत तेथे सर्व पैसे ट्रान्सफर करून घेत म्हटले की, हे पैसे आरबीआयकडे पाठवले जाणार आहे. याशिवाय फोन केलेल्या व्यक्तीने स्थानिक पोलीस स्थानकातून पेमेंटची रिसिप्ट घेण्यासही सांगितली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने खात्यात जवळजवळ 25 कोटी रुपये ट्रान्सफर केले. पण पुन्हा पैसे मिळवता आले नाही. या प्रकरणात पीडित महिलेने पोलीसात धाव घेत अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. आतापर्यंत 31 खाती गोठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

मुंबईतील विमानतळावर कोट्यावधींची तस्करी, नूडल्सच्या पॅकेटमधून आणले होते हिरे

Crime : पत्नीच्याच समोर महिलेवर बलात्कार, धर्मांतरणासाठीही बळजबरी; 7 जणांच्या विरोधात FIR दाखल