Crime : पत्नीच्याच समोर महिलेवर बलात्कार, धर्मांतरणासाठीही बळजबरी; 7 जणांच्या विरोधात FIR दाखल

| Published : Apr 22 2024, 07:31 AM IST / Updated: Apr 22 2024, 07:35 AM IST

FIR against Mumbai cop for raping his colleague under pretext of marriage

सार

Crime News : कर्नाटकातील एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. याशिवाय पीडित महिलेला धर्मांतरण करण्यासही बळजबरी केली.

Crime News : कर्नाटकात 28 वर्षीय लग्न झालेल्या महिलेला तिचे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यासह इस्लाम धर्म स्विकारण्यास बळजबरी करणाऱ्या सात जणांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेबद्दल माहिती देत सांगितले पीडित महिलेनेने आपल्या तक्रारीत म्हटलेय की, आरोपीने आपल्या पत्नीसमोरच तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय पीडित महिलेला बुरखा घालण्यासह कुंकही लावण्यास दिले नाही. 

पीडित महिलेने असा आरोप लावलाय की, "आरोपी रफीक आणि त्याच्या पत्नीने माझ्यासोबत छेडछाड केली. याशिवाय लैंगिक संबंधही ठेवण्यासह अश्लील फोटो काढले. याच फोटोंवरुन वारंवार ब्लॅकमेल करण्यात येत होते. एवढेच नव्हे, इस्लाम धर्म स्विकारण्यसही बळजबरी केली जात होती."

जातीवरून अपशब्दांचा वापर
पोलिसांनी म्हटले की, “रफीक आणि त्याच्या पत्नीने वर्ष 2023 मध्ये महिलेला बेळगावातील आपल्या घरात राहण्यासाठी बळजबरी केली. याशिवाय आम्ही जे सांगू ते तुला करावे लागेल असेही पीडित महिलेल सांगण्यात आले.” पीडित महिलेने आरोप लावलाय की, गेल्या वर्षात ज्यावेळी आम्ही तिघेही एकत्रित राहायचो त्यावेळी रफीकने त्याच्या पत्नीसमोर माझ्यावर बलात्कार केला.

बेळगावाचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेदा यांनी म्हटले की, याच महिन्यात दांपत्याने कथित रुपात महिलेला कुंकू लावण्यासही दिले नाही. केवळ बुरखा परिधान करणे, दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्यास सांगितले जात होते. याशिवाय जातीवरूनही अपशब्दांचा वापर करण्यात आला.

अश्लील फोटो लीक करण्याची आरोपीने दिली धमकी
महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, रफीकने मला नवऱ्याला घटस्फोट देण्यास सांगितले. घटस्फोट न दिल्यास अश्लील फोटो व्हायरल करू अशी धमकी रफीकने दिली होती. याशिवाय धर्मांतरण न केल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. या प्रकरणात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा : 

पत्नी ६ महिन्यांची गरोदर पोटात जुळी मुलं तरीही पतीने जाळून मारले, असं काय घडलं ?

Crime : मुंबईत शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेची छेडछाड, जीवे मारण्याचाही प्रयत्न; आरोपीला अटक