सार

राजस्थानमधील जालोर पोलिसांकडून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. खरंतर, डॉक्टरने महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत तिच्यावर बलात्कार करण्याचा आरोप आहे.

Crime News  : राजस्थानमधील एका डॉक्टरने महिलेवर बलात्कार करण्यासह तिचे अश्लील व्हिडीओ काढल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून डॉक्टर सुरेश सुंदेशा याला अटक करण्यात आली आहे. सुरेशला आज कोर्टासमोर हजर करत कोठडी सुनावली आहे. सध्या सुरेशची चौकशी केली जात असून पीडित महिलेचे अश्लील फोटो-व्हिडीओ त्याच्याकडून घेतले जात आहेत.

रूट कॅनलसाठी गेले होती पीडित महिला
सुरेश हा दातांचा डॉक्टर असून पीडित महिला त्याच्याकडे रूट कॅनल करण्यासाठी गेली होती. सुरेशचे दाताचे खासगी क्लिनिक आहे. याच क्लिनिकमध्ये सुरेशने पीडित महिलेची आधी संपूर्ण माहिती ऐकून घेत तिला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले.

खरंतर, रूट कॅनलवेळी दुखू नये म्हणून डॉक्टर सर्वसाधारणपणे त्यावरील एक इंजेक्शन देतात. पण सुरेशने पीडित महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत तिच्या त्या स्थितीचा फायदा घेत बलात्कार करण्यासह व्हिडीओ काढले. यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत हॉटेल, क्लिनिक आणि घरी देखील बलात्कार केला. पीडित महिलेला याच व्हिडीओवरुन सुरेश त्रास देत होता. अखेर पीडित महिलेले घरातील मंडळींना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगतिला आणि पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी सुरेशला अटक केली आहे.

आणखी वाचा : 

Crime News : तरुणीवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाच पण आरोपीचे पायही कापले गेले

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये

Shocking : तरुणाचा वडील-भावासह 12 नातेवाईकांवर गोळीबार, या कारणामुळे केली सामूहिक हत्या