सार

राजस्थानमधील जयपुर येथील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आरोपीला आपले पाय गमवावे लागले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर.....

Crime News : राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जयपुर येथील एका गावातील प्रागपुरा जवळ शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री एक तरुणीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरंतर पीडित तरुणी आपल्या लहान भावासोबत ऑफिसवरुन घरी येत होती. यावेळी राजेंद्र यादव आणि अन्य एका मुलाने तरुणीच्या स्कूटीला धडक देत तिला खाली पाडले. यानंतर पीडित तरुणीच्या भावाला मारहाण केलीच पण तिच्या शरिरावर 17 ठिकाणी धारधार शस्रानेही वार केल्यानंतर पायावर गोळ्याही झाडल्या. पीडित तरुणीला अद्याप बेशुद्ध अवस्थेत असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीचे दोन्ही पाय कापले गेले
या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करम्यात सुरूवात करत एका आरोपीला ताब्यात घेतले. दुसरा आरोपी राजेंद्र यादव याला सोमवारी (26 फेब्रुवारी) सकाळी जयपुरमधील मालवीय नगर येथून जाणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या रुळांवरुन ताब्यात घेतले. याला आपले दोन्ही पाय कापले गेले आहेत. एक पाय शरिरापासून पूर्णपणे वेगळा झाला असून दुसऱ्या पायाची सर्जरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पीडितेवर याआधीही केला होता सामूहिक बलात्कार
राजेंद्र यादव आणि त्याच्या काही साथीदारांनी याआधीही पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. राजेंद्र, प्रागपुरा येथील कोटपूतली परिसरात राहणारा आहे. यानंतर पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर राजेंद्रला तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्याने पीडित तरुणीला त्रास देण्यास सुरुवात करत त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकू लागला. पीडित तरुणीने नकार दिल्याने शनिवारी रात्री पीडित तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पीडित तरुणी प्रकृती नाजूक
पीडित तरुणीची सध्या नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. परिवाराने म्हटले की, मुलीला गेल्या काही दिवसांपासून धमक्या दिल्या जात होत्या. आम्ही पोलिसांना मुलीच्या सुरक्षिततेची मागणी केली होती. पोलिसांनी त्यासाठी होकारही दिला पण सत्यात सुरक्षितता मुलीला दिली गेली नाही. याचा परिणाम मुलीच्या जीवावर बेतला आहे. सध्या मुलीची अत्यंत नाजूक असून अन्य आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आणखी वाचा : 

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये

23 वर्षीय तरुणीच्या शोधात महाराष्ट्र ते राजस्थान-बिहारचे पोलीस अ‍ॅलर्ट, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले