पिंपरी-चिंचवड येथील स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, तीन महिलांची सुटका

| Published : Apr 08 2024, 08:22 AM IST / Updated: Apr 08 2024, 08:49 AM IST

arrest 3

सार

पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथील एका स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली आहे.

Crime  News : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथील हिंजेवाडी परिसरातील स्पा मध्ये सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायवर पोलिासांनी धाड टाकली. या प्रकरणात पोलिसांकडून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय स्पा मालकासह दोन जणांना अटक केली आहे.

मानवी तस्करी विरोधी पथकाकडून पिंपरी-चिंचवड येथील ब्रिथ स्पा (Breath Spa) वर अचानक धाड टाकली. यावेळी स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश झाला. खरंतर स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची टीप मिळाली होती.

प्रकरणाचा असा झाला पर्दाफाश 
मानवी तस्करी विरोधी पथकाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील एका स्पा मध्ये तरुण महिलांना जबरस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होती अशी टीप मिळाली होती. यामुळे स्पा वर अचानक धाड टाकली असता वेश्याव्यवसाचा भांडाफोड झाला. या प्रकरणात तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा मालकासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींच्या विरोधात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. वेश्याव्यवसायार धाड टाकण्याचे ऑपरेशन पिंपरी-चिंचवड येथील विनय कुमार चौबे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) संदीप डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.

आणखी वाचा : 

कुख्यात गँगस्टर अरुण गवळी जेल मधून बाहेर येणार ? पण ते प्रकरण काय आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय ? जाणून घ्या

मेक्सिकोमध्ये TikTok स्टारसह प्रियकराची हत्या, कपलवर झाडल्या 26 गोळ्या

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा