सार

पुणे येथील एका विद्यापीठातील विद्यार्थ्याला लव्ह जिहादच्या आरोपाखाली बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

Crime News : पुण्यातील एका विद्यापीठातील 19 वर्षीय मुस्लिम विद्यार्थ्यावर लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप लावत त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी मंगळवारी (9 एप्रिल) याबद्दल माहिती दिली आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटना रविवारी (7 एप्रिल) दुपारी घडली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरातून पीडित विद्यार्थी अन्य दोघांसोबत जात होता त्यावेळीच घटना घडली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींची ओखळ पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, या घटनेच्या अधिक तपासासाठी एक समितीही तयार करण्यात आली आहे.

नक्की काय घडले?
अधिकाऱ्यांनी म्हटले की, पीडित विद्यार्थी त्याच्या दोन मैत्रिणींसोबत जेवण करून झाल्यानंतर परत येत होता. यावेळीच पाच अज्ञात व्यक्ती बाइकवरून आले आणि पीडित विद्यार्थ्याजवळ थांबले. त्यांनी पीडित विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारत त्याचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले.

पीडित विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, आधार कार्डवरील नाव पाहिल्यानंतर एका व्यक्तीने त्याला लव्ह जिहादासाठी आल्याचे विचारत हल्ला केला. याशिवाय पीडित विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांवरही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू
या प्रकरणात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज पाहून अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय.

आणखी वाचा : 

पिंपरी-चिंचवड येथील स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, तीन महिलांची सुटका

मेक्सिकोमध्ये TikTok स्टारसह प्रियकराची हत्या, कपलवर झाडल्या 26 गोळ्या

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा