Palghar : पालघरमध्ये अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या, आरोपींना अटक

| Published : Dec 08 2023, 10:26 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:57 PM IST

Palghar Crime

सार

Maharashtra: पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Palghar Crime News : पालघरमधील 16 वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका 8 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. शेजारची मुलगी चिडवते याचा राग मनात ठेवून आरोपीने हे पाऊल उचलले. अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका प्लास्टिक बॅगेत भरून फेकून दिला. हत्येच्या तीन दिवसानंतर पोलिसांना मुलीचा मृतदेह मिळाला. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

पालघर जिल्ह्यातील पेल्हारमध्ये ही घटना घडली आहे. मुलगी 1 डिसेंबरला (2023) रात्री आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. काही तास झाले तरीही मुलगी घरी न आल्याने घरातील मंडळींनी पोलिसात तक्रार दाखल केली. तर 4 डिसेंबरला (2023) एका घराजवळ प्लास्टिक बॅगमध्ये सडलेला मृतदेह सापडला. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये हा मृतदेह पीडित अल्पवयीन मुलीचा असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले, शेजारी राहणारा मुलगा अल्पवयीन मुलगी चिडवते यामुळे तिच्यावर नाराज होता. यामुळे त्याला मुलीला धडा शिकवायचा होता. पीडित अल्पवयीन मुलगी रात्री घराबाहेर एकटी पडल्याचे मुलाने पाहिले. याचाच फायदा घेत आरोपीने तिला आपल्या घरी आणले आणि तिची तेथे गळा दाबून हत्या केली.

दोन दिवस लपवला मृतदेह
हत्या केल्यानंतर आरोपीने दोन दिवस मृतदेह आपल्याच घरी लपवला होता. तिसऱ्या दिवशी आरोपीने या घटनेबद्दल वडिलांना सांगितले. त्यानंतर आरोपीच्या वडीलांनी पीडित अल्पवयीन मुलीचा मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरून फेकून दिला. 

पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेत आरोपीसह त्याच्यासह वडिलांनाही अटक केली. 16 वर्षीय आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. वडिलांना देखील पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली तुरूंगात पाठवण्यात आले आहे.

आणखी वाचा: 

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

US Shooting : लास वेगासमध्ये विद्यापीठात गोळीबार, तिघांचा मृत्यू - एकजण जखमी

धक्कादायक! ट्रेनमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीला तरुणाला साताऱ्यातून अटक