सार

Local Train Girl Kidnapped Case : बदलापूरहून विक्रोळीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचं लोकलमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने मुलीचे अपहरण करून तिला साताऱ्यात नेले होते.

 

Local Train Girl Kidnapped Case : मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बदलापूर लोकलमधून (Badlapur Local Train news) विक्रोळी स्थानकाच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (minor girl kidnapped from local) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीटीआय आणि MID-DAY ने दिलेल्या वृत्तानुसार, 17 वर्षीय मुलीला तिच्या 19 वर्षीय मित्रानेच (Crime News) पळवून सातारा जिल्ह्यात नेल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. सुदैवाने या मुलीची सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना रविवारी (15 ऑक्टोबर 2023) यश मिळाले.

कधी घडली ही घटना?

12 ऑक्टोबर 2023 रोजी ही मुलगी बदलापूर लोकलमधून विक्रोळीला जात होती. विक्रोळी परिसरात राहणारी ही मुलगी गुरुवारी बदलापूरमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी गेली होती. यानंतर नातेवाईकांनी बदलापूर लोकलमध्ये बसून तिला घरी पाठवले. 

पण मुलगी घरीच न पोहोचल्यानं काळजीपोटी कुटुंबीयांनी नातेवाईकांना फोन केला. मुलीचा फोन बंद येत असल्याने तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांची काळजी आणखी वाढली.

पोलिसांत दाखल केली तक्रार

मुलीच्या काळजीने व्याकुळ झालेल्या आईवडिलांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळेस पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी माहिती मिळाली की, मुलीच्याच एका मित्राने आमिष दाखवून तिचे अपहरण (Minor Girl Kidnapped From Badlapur Local) केले.

यानंतर पोलिसांनी दोघांच्याही मित्र-मैत्रिणींची चौकशी केली असता हे दोघंही सातारा जिल्ह्यातील शेंद्र गावात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी अशी केली मुलीची सुटका

ही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक गावामध्ये पोहोचले. शेंद्रे गावामध्ये (Shendre village in Satara) पोहोचल्यानंतर बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना पोलिसांनी ती एका घराबाहेरच्या रस्त्यावर उभी असल्याचे दिसले. 

पोलीस तिची चौकशी (Crime News In Marathi) करत असतानाच आरोपी तरुण देखील घराबाहेर आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

माता न तू वैरिणी! नवजात बाळाला पिशवीत भरून मिठी नदीत फेकलं, मुंबईतील धक्कादायक घटना

Madhya Pradesh Crime : क्रूरता ! वडिलांचा जीव जाईपर्यंत काठीने बेदम मारहाण करत होता पोटचा मुलगा, कारण…

Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण…