महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा अटक आरोपीचा दावा आहे.
डिजिटल अटक ही फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे. खोटी माहिती आणि बनावट खटल्यांद्वारे सामान्य नागरिकांना फसवले जात आहे. यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची ओळख पडताळून पहा आणि १९३० वर संपर्क साधा.
दिल्लीत सर्वाधिक मोठ्या ड्रग्ज जाळ्याचा स्पेशल सेल पोलिसांनी पर्दाफाश केल्याचे वृत्त समोर आले आहे. या धाडीमध्ये 500 किलोग्रॅमपेक्षा अधिक कोकेन जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थानमध्ये एका महिलेने आपल्या पतीला झाडाला बांधून त्याच्यावर क्रूर अत्याचार केले. पतीला महिलांचे कपडे घालून, चपलांनी मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पत्नीसह सहा जणांना अटक केली आहे.
बेंगळुरूमध्ये एका तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये लपवण्यात आले. मृताचा प्रियकर फरार असून, पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे.
नागपूरमधील पारडी परिसरात एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मुलीच्या पाच वर्षांच्या बहिणीसमोरच हे कृत्य केले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नागपुरात संपत्तीच्या वादातून एका महिलेने आपल्या चुलत भावांना सुपारी देऊन सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता सत्य उघड झाले.
स्वतःच्या पत्नीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याची अनोखी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला ड्रग्ज दिले आणि तिला 10 वर्षे वेगवेगळ्या पुरुषांसोबत झोपायला लावले. सत्य बाहेर आल्यावर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एका मुलाने दारूच्या नशेत आपल्याच आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या मुलासोबत मामाच्या घरातून परतत असताना हा प्रकार घडला.
नाशिकमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने आईला आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
Crime news