कोणत्याही इमारतीवरून उडी मारू शकतो असा दावा या विद्यार्थ्याने आपल्या सहकाऱ्यांना केला होता. त्यानंतर त्याने हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.
एम्समधील एका उच्चपदस्थ डॉक्टरने ५० कोटी रुपये हुंडा मागितल्याचा आरोप एका तरुणीने सोशल मीडियावर केला आहे. तिच्या मैत्रिणीसाठी हा हुंडा मागितल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुजफ्फरनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अवैध हत्यारे विकणाऱ्या ७ गुंडांना अटक करण्यात आली. वाहन तपासणी दरम्यान पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले, ५ अवैध पिस्तुले आणि गोळ्या जप्त केल्या.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिग बॉस 18 च्या सेटवर 60 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप यांच्या वयाबाबत न्यायालयाने ओसीफिकेशन चाचणीचे आदेश दिले होते. चाचणीअंती कश्यप अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी हत्येची जबाबदारी घेतलेल्या लॉरेन्स बिष्णोई गॅंगमध्ये ७०० शुटर असल्याचे वृत्त आहे. एनआयएने बिष्णोईची तुलना दाऊद इब्राहिमशी केली असून, त्याच्या गॅंगचा विस्तारही दाऊदप्रमाणे झपाट्याने झाला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली असून दाऊद आणि सलमानशी संबंधीत व्यक्तींचा असाच शेवट होईल असा इशारा दिला आहे. लॉरेन्स बिष्णोई हा पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा असून त्याचे खरे नाव सतविंदर सिंह आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने गुन्हेगारीच्या जगात आपले स्थान कसे निर्माण केले ते जाणून घ्या. लॉरेन्स जेलमधून टोळी चालवतो आणि त्याचे साथीदार परदेशातून गुन्हे करतात.
राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने सिद्दीकींना लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. बिश्नोई गँगने सलमान खानलाही धमकी दिली आहे.
बाबा सिद्धीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगचा या हत्येमध्ये हात असल्याचा संशय आहे, मात्र त्यांनी अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलिसांनी तपासासाठी चार पथके तैनात केली आहेत.
Crime news