बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गॅंगने घेतली आहे. बिष्णोई गॅंगमध्ये एकूण ७०० शुटर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
एनआयएने दाऊद इब्राहिमसोबत बिष्णोईची तुलना केली आहे. त्यामुळं आता लॉरेन्स बिष्णोई गॅंग समोरच्या अडचणी वाढणार आहेत.
लॉरेन्स बिष्णोई गॅंगने त्यांच्या टोळीचा विस्तार पटकन केला आहे. दाऊद इब्राहिमने यासारखंच ९० च्या दशकामध्ये स्वतःच्या टीमचा विस्तार केला होता.
बिष्णोई गॅंगमध्ये एकूण ७०० पेक्षा जास्त शुटर असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामधील जवळपास ३०० पेक्षा जास्त शुटर हे पंजाबमधील आहेत.
वसुलीच्या धंद्यातून बिष्णोई गॅंगने कोट्यावधी रुपये कमावले आहेत. युवकांना कॅनडा किंवा इतर कोणत्याही देशात जाण्याचं लालच देऊन या गॅंगमध्ये भरती केलं जात.