उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेतल्या. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा नवा भारत असून तो आता कुणालाही घाबरत नाही असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी पोओकेबाबत ही मोठे वक्तव्य केले आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी पालघरमधील सभेला संबोधित करताना त्यांनी पीओकेबाबत मोठा दावा केलाय. सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘जो आम्हाला मारतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील तेच करू जे त्याच्या लायकीचे आहे. आता हेच होत आहे. आता पाकव्याप्त काश्मीर वाचवणेही पाकिस्तानला कठीण जात आहे. तुम्ही नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन दाखवा. पुढील 6 महिन्यात पीओके भारताचा होईल हे तुम्हाला दिसेल. यासाठी हिंमत लागते. ताकद असेल तरच हे काम करता येईल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हा नवा भारत 

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘आम्ही काँग्रेस आणि इंडिया आघाडी सारखे नाही. हे लोक म्हणायचे की पाकिस्तानातून दहशतवादी येत आहे मग आम्ही काय करू. आज पाकिस्तानने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तरी डोळे काढले जातात. न घाबरता, न थांबता आणि खचून न जाता विकासाच्या प्रवासात वाटचाल करणारा हा नवा भारत आहे. याचे नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. या प्रकारचा नवा भारत तुम्हा सर्वांसमोर आहे.

योगींचा ४०० पारचा नारा

कुर्ल्यातील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मोदी सरकारचे नारे पुन्हा एकदा देशभर गुंजत आहेत. यावेळी 400 च्या वर गेल्याने काँग्रेस आणि विरोधक त्रस्त आहेत.