सार

Crime News : मुंबईतील काळबादेवी येथील आदित्य हाइट्स इमारतीतून सहा लोकांच्या एका टोळीने 4 कोटी रूपयांची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांचा अवघ्या 30 तासात शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Robbery in Courier Company : मुंबईतील काळबादेवीच्या (Kalbadevi) रामवाडी परिसरातील आदित्य हाइट्स (Aditya Height) इमारतीतील केडीएम एंटरप्राइजेज कंपनीतून 4.03 कोटी रूपये चोरट्यांच्या टोळीने लुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अवघ्या 30 तासात पूर्ण केला आहे. यामधील सर्व आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरट्यांच्या टोळीने 10 डिसेंबरला (2023) केडीएम एंटरप्राइजेजच्या कार्यालयात चोरी करण्याचा कट रचला होता. चोरी करताना आरोपींनी कार्यालयातील दोन लोकांना बांधून ठेवले आणि 4.03 कोटी रूपये लुटले. या प्रकरणाची तातडीने माहिती पोलिसांना दिल्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

व्ही. पी रोड पोलीस ठाणे आणि अन्य पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या व आरोपींचा तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांना कळले की, आरोपी ही मोठी रक्कम घेऊन गुजरातला पळाले आहेत. 

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये दाखल झाले. अखेर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून 4.03 कोटी रूपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. आरोपींची ओळख हर्षद ठाकूर (वय 26 वर्ष), राजुबा वाघेला (वय 21 वर्ष), अशोकभा वाघेला (वय 26 वर्ष), चरणभा वाघेला (वय 26 वर्ष), मेहुल सिंह धाबी (वर्ष 24 वय) आणि चिराग ठाकुर (वय 26 वर्ष) च्या रूपात झाली आहे. आरोपींच्या विरोधात कलम 454, 392, 341, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा: 

Mumbai: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात नवऱ्याचा बायकोवर चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक

Palghar : पालघरमध्ये अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या, आरोपींना अटक

मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत वडिलांकडून उकळले पैसे, तपासात धक्कादायक कारण समोर