Mumbai: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात नवऱ्याचा बायकोवर चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक

| Published : Dec 12 2023, 10:24 AM IST / Updated: Dec 12 2023, 10:28 AM IST

jail, arrest
Mumbai: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात नवऱ्याचा बायकोवर चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Mumbai Crime: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात बायकोवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बायकोवर हल्ला करण्याआधी आरोपीचे तिच्यासोबत भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Husband Attack On Wife With Knife: मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आपल्या बायोकवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपाखाली शासकीय रेल्वे पोलिसांनी शनिवारी (9 डिसेंबर, 2023) एका 36 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, अमनदीप जाधव असे आरोपीचे नाव आहे. अमनदीप आणि त्याची पत्नी (35 वर्षे) यांच्यामध्ये कांजूर रेल्वे स्थानकात आधी भांडण झाले होते. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेने विक्रोळी स्थानकातून डोंबिवलीकडे जाणारी ट्रेन पकडली आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात उतरली. घरी जाण्यासाठी महिला पादचारी पुलावर चढली त्यावेळेस तिचे लक्ष नवऱ्याकडे गेले. नवऱ्याने तिला बाजूला येऊन बोलूयात असे म्हटले.

पीडिताने मी घाईत असून घरी जायचे आहे असे नवऱ्याला सांगितले. खरंतर हे नवरा-बायको एकमेकांपासून वेगळे राहत होते. जाधवने बायकोला त्याची बहिण प्लॅटफॉर्म क्रमांक-1 वर तुझी वाट पाहात असल्याचे सांगितले. यामुळे पीडिता जाधव याच्यासोबत जाण्यास निघाली. पण कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक- 1 वर असतानाच त्या दोघांमध्ये भांडण झाले.

जाधवला बायकोने त्याच्यासोबत घरी यावे हे आरोपीचे म्हणणे होते. मात्र बायकोने त्यासाठी नकार दिला. याशिवाय जाधवने बायकोकडे घटस्फोट मागितला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी जाधवने चाकू काढला आणि बायकोवर हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी म्हटले, पीडित महिलेच्या हातावर चाकू हल्ला केल्याच्या जखमा आहेत.

या सर्व प्रकारानंतर कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातील पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.पोलिसांनी म्हटले की, "आरोपीवर विक्रोळीत छेडछाड करणे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा (POCSO) अंतर्गत याआधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय आरोपीवर दोन अदखलपात्र गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर आहे."

आणखी वाचा: 

मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत वडिलांकडून उकळले पैसे, तपासात धक्कादायक कारण समोर

Palghar : पालघरमध्ये अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या, आरोपींना अटक

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या