सार

Mumbai Crime News : मुंबईमध्ये 64 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी इथंवरच थांबले नाहीत, त्यांनी महिलेच्या संपूर्ण शरीरावर हातोड्याने वार केले.

Mumbai Crime News : सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे मुंबापुरी पुन्हा एकदा हादरली आहे. तीन तरुणांनी एका 64 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. यांचे कुकृत्य इथंवरच थांबले नाही, आरोपींनी या पीडित महिलेला नग्नावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकले.

संपूर्ण शरीरावर केले हातोड्याने वार

ट्रॉम्बे परिसरात सोमवारी (18 डिसेंबर) ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या संपूर्ण शरीरावर आरोपींनी हातोड्यावर वार करून तिला जखमी केले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

मंदिरात जात होती पीडित महिला

पीडित वयोवृद्ध महिलेच्या मुलीने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री तिची आई परिसरातील खंडोबा मंदिरात पूजा करण्यासाठी जात होती. यावेळेस तीन जणांनी पाठलाग करून तिचे अपहरण केले. यानंतर एका निर्जन स्थळी नेऊन तिच्या आईवर बलात्कार केला. दुसरी दिवशी सकाळी पीडित महिला रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका महिलेने पाहिले आणि तिने याबाबत तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

एका आरोपीला अटक

सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

पीडित महिला तिची मुलगी आणि नऊ वर्षांच्या नातीसोबत राहते. केरकचरा स्वच्छ करून ती आपला उदरनिर्वाह करते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा :

एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आईची मागणी

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

धक्कादायक! ट्रेनमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीला तरुणाला साताऱ्यातून अटक