सार

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील एका तरुणीची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आरोपीचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News In Marathi : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातून (Narsinghpur District) एक मोठे वृत्त समोर येत आहे. येथे एका तरुणीची भररस्त्यात गोळी घालून हत्या (Man Shot Dead Girl In Narsinghpur) करण्यात आली आहे. यानंतर तरुणीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे.

आरोपी कित्येक दिवसांपासून करत होता तरुणीचा पाठलाग

नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगावामध्ये (Gotegaon News) ही खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी (15 डिसेंबर 2023) उशीरा रात्री सिंधी कॉलनी परिसरातील शीतल धर्मशाळेजवळ धर्मेंद्र उर्फ डीके (वय 23 वर्षे) नावाच्या तरुणाने काजल साहू (वय 22 वर्ष) (Kajal Sahu) या तरुणीच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली आणि घटनास्थळाहून तो फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

यानंतर काजलला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण काजलला कित्येक दिवसांपासून त्रास देत होता.

काजलवर भररस्त्यात केला हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल साहू आपले काम करून जबलपूरहून स्वतःच्या घरी परतत होती. रेल्वे स्थानकातून ती जशी बाहेर पडून काही अंतरावर पोहोचल्यानंतर धर्मेंद्रने तिच्यावर गोळी झाडली. पोलिसांनी घटनास्थळाहून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

‘त्याने माझ्या मुलीला मारलं, आरोपीला फाशीची शिक्षा द्या’

आपली लाडकी लेक या जगात नाही, हे सत्य स्वीकारणेच काजलच्या आईला कठीण जात आहे. आरोपी तरुण माझ्या लेकीला दोन वर्षांपासून त्रास देत होता, अशी माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली. कित्येकदा समजावून सांगितल्यानंतरही त्याच्या वागणुकीत काहीही बदल झाला नाही. 

त्याने माझ्या लेकीचा जीव घेतला. आता सरकार आणि पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. तेव्हाचा आम्हाला न्याय मिळेल, अशी मागणीही काजलच्या आईने केली आहे. या मागणीसाठी काजलच्या कुटुंबीयांनी चक्काजाम आंदोलन देखील केले होते.

आणखी वाचा

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

धक्कादायक! ट्रेनमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपीला तरुणाला साताऱ्यातून अटक

माता न तू वैरिणी! नवजात बाळाला पिशवीत भरून मिठी नदीत फेकलं, मुंबईतील धक्कादायक घटना