माता न तू वैरिणी! नवजात बाळाला पिशवीत भरून मिठी नदीत फेकलं, मुंबईतील धक्कादायक घटना

| Published : Oct 13 2023, 02:25 PM IST / Updated: Dec 26 2023, 11:34 AM IST

Mumbai_Woman_Throws_Newborn_Into_River

सार

Mumbai Woman Throws Newborn Into River : आईने नवजात बाळाला नदीत फेकल्याची खळबळजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mumbai Woman Throws Newborn Into River : आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतील दादर परिसरात घडली आहे. वांद्रे परिसरात पुलावरून मिठी नदीमध्ये नवजात बाळ फेकल्याप्रकरणी (Newborn Boy Into The Mithi River) 34 वर्षीय महिलेसह तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्याविरोधात दादर पोलिसांनी (Dadar Police) गुन्हा दाखल केला आहे. MID DAYया वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही धक्कादायक घटना 10 ऑक्टोबर 2023 रोजी घडली होती.

प्रेग्नेंट असल्याची माहिती लपवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेग्नेंसीमुळे या महिलेचे पोट दिसू लागलं होते. पण ट्युमरच्या दोन गाठींमुळे पोट फुगल्याचे सांगत तिनं प्रेग्नेंट असल्याची माहिती मित्रपरिवार तसंच ऑफिसमधल्या सहकाऱ्यांपासून लपवली. ही महिला गेल्या दोन वर्षांपासून दादर येथील एका एजन्सीमध्ये काम करतेय आणि जवळच्याच परिसरात काही महिलांसोबत ती एका घरामध्ये राहत होती.

बाळ जिवंत नसल्याचा महिलेचा दावा

10 ऑक्टोबरला या महिलेनं एक मुलाला जन्म (Woman Delivered A Boy) दिला. पण बाळ मृतावस्थेतच जन्माला आल्याचे तिचं म्हणणं आहे. यानंतर घाबरलेल्या महिलेनं ऑफिसमधील सहकाऱ्याच्या मदतीने नवजात बाळाला मिठी नदीत फेकले. पण त्यांनी केलेले हे लज्जास्पद कृत्य फार काळ लपून राहिले नाही. 

प्रकरण उघडकीस येताच दादर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिचा ऑफिस सहकारी जलालुद्दीन आलमवर (Office Colleague Jalaluddin Alam) गुन्हा दाखल केला. प्रसूतीनंतर या महिलेला सध्या पुढील औषधोपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक! टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

पोलिसांच्या माहितीनुसार, “पोटात दुखत असल्याने ही महिला 10 ऑक्टोबरला घरातच होती. प्रसूती होणार असल्याचं लक्षात येताच ते तपासण्यासाठी ती घरातील वॉशरूममध्ये गेली. यावेळेस तिनं टॉयलेटमध्येच बाळाला जन्म दिला, पण बाळ मृतावस्थेत असल्याचा दावा तिनं केला. 

ही घटना घडली तेव्हा तिच्या दोन मैत्रिणी देखील घरातच होत्या. दरम्यान यानंतर तिनं नवजात बाळ प्लास्टिकच्या पिशवीत भरून बांधलं आणि आलमच्या मदतीने नदीत फेकले”.

प्रकरण कसे आले उघडकीस?

अज्ञातांनी नदीमध्ये नवजात बाळ फेकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महिलेच्या घराचा पत्ताही शोधला. चौकशीदरम्यान (Crime News) पोलिसांना महिलेचं वागणं-बोलणं संशयास्पद असल्याचे आढळले.

त्यामुळे महिलेसह तिच्या सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. अखेर महिलेनं मुलाला जन्म दिल्याचे मान्य केले, पण बाळ मृत अवस्थेत जन्मल्याचा दावाही केला. तसंच बाळाला आलमच्या मदतीने नदीत फेकल्याचीही कबुली दिली. 

याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा (Crime News In Marathi) दाखल केला असून पुढील तपासासाठी नोटीसही बजावली आहे.

आणखी वाचा

Lalbaugcha Raja Mandal : लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने ठोठावला 72 हजार रुपयांचा दंड, कारण…

Madhya Pradesh Crime : क्रूरता ! वडिलांचा जीव जाईपर्यंत काठीने बेदम मारहाण करत होता पोटचा मुलगा, कारण…

Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण...