लातूरमध्ये पोटच्या पोरीची वडिलांकडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येमागील कारण अगदी शुल्लक असून मुलीने वडिलांकडे चॉकटेलची मागणी केली होती. 

लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणावरून एका पित्याने आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मुलीचं नाव आरुषी बालाजी राठोड (वय ४) असून आरोपीचे नाव बालाजी बाबू राठोड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला दारूचे अतिव्यसन असून तो नेहमीच पत्नी वर्षा राठोड यांना मारहाण करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी वर्षा आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी गेली होती.

मुलीला जबरदस्तीने सासुरवाडीतून घेऊन गेला

९ जून रोजी बालाजी राठोड आपल्या सासुरवाडीत गेला आणि तिथून आरुषीला जबरदस्तीने घेऊन आपल्या घरी आला. त्यानंतर मुलगी वडिलांसोबतच राहत होती. नातेवाईकांनी अनेकदा समजावून सांगितलं की, मुलीला आईकडे परत नेऊन सोडावं, मात्र आरोपीने कोणाचंच ऐकलं नाही.

"पप्पा, मला चॉकलेट द्या" – आणि पित्याचा संताप

रविवारच्या दुपारी आरुषीने आपल्या वडिलांकडे चॉकलेटसाठी पैसे मागितले. या साध्या आणि निरागस मागणीमुळे संतापलेला बालाजीने आपल्या राहत्या घरी साडीने आरुषीचा गळा दाबून तिचा जीव घेतला.

रविवारी दुपारी सासू मंगलबाई राठोड यांनी वर्षाच्या काकांना फोन करून आरुषीच्या हत्येची माहिती दिली. ही बातमी मिळताच वर्षाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती तातडीने उदगीरच्या शासकीय रुग्णालयात धावली. तिथे पोहोचल्यावर तिला तिची चिमुकली मुलगी मृत अवस्थेत पाहायला मिळाली आणि ती प्रचंड कोसळली.

आरोपीला फाशीची मागणी

या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपी बालाजी राठोड याला अटक केली आहे. वर्षा राठोड यांनी आपल्या पतीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. संपूर्ण घटनेने राज्यभरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात क्रिकेट खेळण्याच्या वादातून हत्या

पुण्यातील अहिल्यानगरमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चक्क एका मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या वादातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मधल्या सुटीतच दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला. ही घटना शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

जुन्या वादातून खून

मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा आपल्या सासरच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. त्या परिसरातील एका कुटुंबाला हे पटत नसल्याने सतत भांडणे होत होती. "तुमच्या मुलाला समजवून सांगा, नाहीतर त्याला जिवंत सोडणार नाही," अशा धमक्या त्या कुटुंबाकडून मिळत होत्या.या वादावरून २०२४ मध्ये मयताच्या बहिणीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्या जुन्या वादातूनच हा संतापजनक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.