लातूर जिल्ह्यात एका व्यक्तीने विमा रकमेसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने लिफ्ट मागणाऱ्या व्यक्तीची खून करून आपली कार जाळली.
आताच्या काळात कधी काय होईल सांगता येत नाही. लातूर जिल्ह्यातून एक अशीच घटना समोर आली आहे. औसा वाढवणा रोडवर एक कार जळालेल्या अवस्थेत दिसून आली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्या व्यक्तीनं खोटेपणाचा आव आणून विमा कंपनीकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचं यामध्ये दिसून आलं आहे.
एका फोन कॉलमुळं सगळं प्रकरण आलं लक्षात
एका फोन कॉलमुळं सगळं प्रकरण लक्षात आलं आहे. लातूरमधील औसा तालुक्यातील वानवडा रोडवर 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता एका कारला आग लागून ती पूर्णपणे जळाली होती. कारमध्ये एक व्यक्ती जळून मृत्यूमुखी पडला होता. संबंधित व्यक्तीवर कर्ज होतं, त्यानं यावेळी एका व्यक्तीला जाळून टाकलं आणि त्याची स्वतःचीच हत्या झाली असा आव आणला.
लिफ्ट मागणाऱ्याची केली खून
लिफ्ट मागणाऱ्याचीच संबंधित व्यक्तीनं खून केली आहे. 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता घरातून बाहेर पडलेल्या गणेशने याकतपूर नपूर रोड चौकात गोविंद किशन यादव (वय 50, रा. पाटील गल्ली, औसा) यांना लिफ्ट दिली. दारूच्या नशेत असणाऱ्या व्यक्तीला सीट बेल्ट लावून त्याची खून करण्यात आली. त्यामुळं नंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताबोडतोब अटक केली.
एका महिलेच्या संपर्कात गणेश चव्हाण हा व्यक्ती आला आणि नंतर त्याचा ट्रेस काढणं पोलिसांना सोपं गेलं. यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा ट्रेस काढला आणि त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औसा येथून अटक केली. सदरची महिला हि गणेशची प्रियसी आहे कि मैत्रीण याबाबतचा उलगडा मात्र पोलिसांना अजूनही लागला नाही.


