सार

ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने सूर्यग्रहणाच्या दिवशी आपल्या पती व मुलांना संपवलं आहे. 8 एप्रिलला सूर्यग्रहण होतं, त्यामुळे चिंतेत असलेल्या या महिलेने आधी दोन खून करून मग आत्महत्या केली.

ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने सूर्यग्रहणाच्या दिवशी पतीची आणि दोन मुलांची केली हत्या करत स्वतःला संपवलं. 8 एप्रिलला सूर्यग्रहण असल्याने ती तणावात होती, यातून तिने पती आणि मुलांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगतिले आहे. ही घटना अमेरिकेत घडली असून डॅनियल जॉन्सन असं महिलेचं नाव आहे. डॅनियल अयोका नावाने ती प्रसिद्ध असून तिचा ज्योतिष एन्फ्ल्युएन्सर म्हणून ती ओळखाली जायची.

अयोका सूर्यग्रहणाबद्दल खूप संशोधन करत होती.यातून ती तणावाखाली वावरत असताना तिला भीती वाटायला लागली. भीतीचे कारण नेमके तिलाही माहिती नसल्याने तिने पायलट असलेल्या तिच्या २९ वर्षीय पतीच्या छातीत चाकूने वार केले, यात त्याचा मृत्यू झाला. मग ती तिच्या नऊ वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या मुलांना घेऊन कारने निघाली आणि धावत्या कारमधून त्यांना बाहेर फेकलं. या घटनेत आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला असून मोठा मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत असाही पोलिसांनी नमूद केले आहे. यानंतर कारने ही महिला पुढे गेली आणि तिची कार झाडाला आदळली. या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या अर्ध्या तासानंतर त्यांना पॅसिफिक कोस्ट हायवेवर अपघात झाल्याची माहिती मिळाली. तिथे एक आलिशान कार झाडावर आदळली होती. तपासासाठी पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना रक्ताने माखलेले पायाचे ठसे आणि महिलेचा पती जेलेन ॲलन चॅनीचा मृतदेह आढळला. महिलेने सूर्यग्रहणाचे परिणाम खूप मनावर घेतले होते, त्याचा तिच्यावर इतका प्रभाव होता की तिचं मानसिक संतुलन बिघडलं, असं तिच्या वेबसाइटवर व सोशल मीडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टवरून दिसून येतंय. तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा :

पुणे येथे बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, पाच जणांना अटक

पुणे विद्यापीठात लव्ह जिहादच्या आरोपाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड येथील स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, तीन महिलांची सुटका