पुण्यातील पर्वती भागात एका ७० वर्षीय आजोबाने आपल्याच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामावर गेलेल्या आई-वडिलांचा विश्वासघात करत या आजोबाने हे कृत्य केले असून, संतप्त आईने आपल्याच वडिलांना फाशी देण्याची मागणी केली.

पुण्यात महिला आणि मुलींवर सुरु असणारे अत्याचार थांबत नसल्याचं दिसून आल आहे. आता परत एकदा एका लहान मुलीवर अत्याचार झाल्याचं दिसून आलं आहे. पर्वती भागात एका ७० वर्षीय म्हताऱ्या व्यक्तीनं त्याच्याच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं संपूर्ण पुणे आता ढवळून निघालं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुलीच्या आईने बापाला फाशी देण्याची केली मागणी 

मुलीच्या आईने तिच्या जन्मदात्या बापाला फाशी देण्याची मागणी केली आहे. या बापाने मुलीच्या अंगावर हात टाकल्यामुळं तिच्या आईची तळाची आग मस्तकाला गेल्याच दिसून आलं. मुलीच्या आईवडिलांनी आम्ही दोघे कामाला गेल्यानंतर मुलांना सांभाळायला वडील घरी असतात असं सांगितलं. आता त्याच वडिलांनी त्यांचा विश्वासघात केला आहे.

पोलीस सहकार्य करत आहेत 

यावेळी मुलीच्या आई वडिलांनी पोलीस सहकार्य करत असल्याचं सांगितलं. वडिलांनी मी रिक्षा चालवत असून रात्री घरी येत असल्याचं सांगितलं. आमचा मुलगा घरात झोपला होता आणि हे सगळं संध्याकाळी घडलं. मुलीची आई सात वाजता कामावरून घरी आली. त्यावेळी त्यांना घरी आल्यानंतर हे सगळं लक्षात आलं. मुलीच्या आजोबांनी तिच्यावर अतिप्रसंग केला असं यावेळी सांगण्यात आलं आहे.