सार

मुंब्र्यात एका आईने पोटच्या बाळाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अघोरी कृत्यासाठी आई-वडिलांनी आपल्या १८ महिन्यांच्या मुलीचा स्मशानात नेऊन हत्या केली आहे.

ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंधश्रद्धेतून आईने पोटच्या १८ महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत तिच्या आई-वडिलांनी तिला स्मशानात नेऊन तिला संपवलं आहे.नाहक अंधश्रद्धेच्या आहारी जात आई वडिलांनीच पोटच्या लेकराचं अंत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे.मात्र या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी अघोरी कृत्य करत होते. बाळाच्या ⁠अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत आईने आपल्या १८ महिन्यांच्या बाळाला स्माशानभूमीत नेले. तेथे काही मंत्र-तंत्र म्हणत निर्दयीपणे १८ महिन्याच्या बाळाची हत्या केली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

निनावी पत्रामुळे प्रकार उघडकीस :

१८ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याचा हा सगळा प्रकार एका निनावी पत्रामुळे उघड झाला आहे. पोलिसांना एक निनावी पत्र सापडलं होतं. या पत्राच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. ⁠मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने तिची हत्या केल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. बाळाच्या ⁠अंगात सैतान येत होता. त्यामुळे मुलीची हत्या केल्याचं त्यांनी सांगितलं.⁠ मुंब्रा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

कायद्या अंतर्गत शिक्षेची तरतूद :

  • अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्ह्यांची नोंद
  •  दोषींना किमान सहा महिने कमाल सात वर्षे शिक्षा
  •  पाच ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

महाराष्ट्रात वाढत आहेत अंधश्रेद्धेच्या घटना :

कोणी नोकरी मिळवण्यासाठी, तर कोणी मुलगा होण्यासाठी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे. यामुळे अंधश्रद्धेला खात पाणी मिळत असून यातून अनेकांची फसवणूक देखील होत आहे. तसेच यातून अनेक महिलांचे लैंगिक शोषण देखील होत आहे.

आणखी वाचा :

आईच निघाली वैरी, मित्र बलात्कार करतोय माहिती असूनही शांत बसली

Ayoka : ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने सूर्यग्रहणाच्या दिवशी पतीची आणि दोन मुलांची केली हत्या; नंतर अपघाती मृत्यू