हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्यास होते अडचण? या पाच सवयींना बनवा जीवनशैलीचा भाग

हिवाळ्यात अंथरुण सोडणे कठीण असते, विशेषतः सकाळी लवकर उठण्याची वेळ येते तेव्हा. काही सोप्या टिप्स वापरून, जसे की पडदे उघडे ठेवणे, चेहऱ्यावर थंड पाणी मारणे, पुरेशी झोप घेणे, आणि अलार्म योग्यरित्या वापरूण तुम्ही हिवाळ्यातही सकाळी सहज उठू शकता.

Healthy Tips:  हिवाळ्यात अंथरुण सोडून उठण्याची इच्छा होत नाही. सकाळ असो किंवा रात्र पांघरुण घेऊन झोपून राहावे असे वाटते. परंतु सकाळी वेळेवर उठणे आणि दिनचर्या सुरू करणे खुप आवश्यक असते. ऑफीसला जाणारे लोक सकाळी लवकर उठतातच, याचबरोबर घरात महिलांना देखील जेवण बनवण्यासाठी लवकर उठवे लागते. लहान मुलांना देखील शाळेत जाण्यासाठी उठणे गरजेचे असते. अशातच हिवाळ्यात सकाळच्या वेळी कसे उठावे याचा विचार करण्यातच अर्धा वेळ निघून जातो. परंतु तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सकाळी विना अडथळा उठता येऊ शकते.

सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स

पडदे उघडे ठेऊन झोपणे

हिवाळ्यात सकाळच्या वेळी पडदे बंद असतील तर खोलीत खुप अंधार असतो. अंधारात उठु वाटत नाही. त्यामुळे शक्य असेल तर खिडकीचे पडदे उघडून झोपावे. यामुळे खोलीत उजेड राहील आणि झोपेतून उठण्यास मदत होईल.

चेहऱ्यावर थंड पाणी मारा

हिवाळ्यात थंड पाण्याला हात लावणे सुद्धा आपल्याला आवडत नाही. त्यामुळे जर तुम्ही थंड पाणी चेहऱ्यावर माराल तर थंडी कमी होऊ शकते. यामुळे झोप लगेच उडते. जेव्हा अलार्मने जाग येईल तेव्हा लगेच थोडेसे पाणी चेहऱ्यावर मारावे.

झोप पुर्ण करणे आहे गरजेचे

रात्रभर झोप पुर्ण न झाल्यास सकाळी उठण्यास अडचण होते. जर तुमची झोप अर्धवट राहिली तर हिवाळ्यात सकाळी वेळेवर उठणे शक्य होत नाही. त्यामुळे हिवाळ्यात रात्री वेळेवर झोपावे.

मोठ्या आवाजात संगीत ऐका

ज्याप्रमाणे अल्हाददायक गाणे ऐकुन रात्री चांगली झोप लागते, त्याचप्रमाणे मोठ्या आवाजात गाणे ऐकुन झोपेतुन जाग येऊ शकते. ज्यावेळी अलार्म वाजेल त्यावेळी काही मोठ्या आवाजात गाने ऐकु शकता.

अलार्म बंद करु नका

जर तुम्ही अलार्म मिस केला आणि त्याला स्नुज करत राहिलात तर अलार्म ऐकुन दर थोड्या वेळाने तुमची झोप मोडू शकते. जर तुम्ही अलार्म बंद करण्याचा विचार केला आणि पाच मिनिटानंतर आपोआप जाग येईल असा विचार केला तर असे होऊ शकते की तुम्ही पुढचे ३०-४० मिनिट झोपुनच राहाल आणि तुम्हाला जाग येणार नाही. त्यामुळे अलार्मला स्नुज करा पण बंद करू नका.

हेही वाचा:

पोटाची चरबी कमी करायची?, सकाळी या पिवळ्या दाण्यांचे पाणी प्या!

मेथीच्या कडवटपणामुळे तोंडाची चव खराब होते का?, या 5 टिप्सने कडवटपणा दूर करा

Share this article