Valentines Day : या देशांमध्ये 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केल्यास होऊ शकतो तुरुंगवास

14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जाणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, काही देशात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यास बंदी आहे. याशिवाय ‘व्हॅलेंनटाइन’ साजरा केल्यास कठोर शिक्षाही दिली जाते....

Chanda Mandavkar | Published : Feb 12, 2024 1:16 PM IST
16
पाकिस्तान

पाकिस्तानात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी खूप विरोध केला जातो. वर्ष 2018 मध्ये हायकोर्टाने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करणे आणि त्याचे मीडिया कव्हरेज करण्यावर बंदी घातली होती. कारण ‘व्हॅलेंनटाइन डे’ पाश्चिमात्य देशाची संस्कृती असल्याचे म्हटले होते.

26
सौदी अरेबिया

सौदी अरेबियामध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर बंदी आहे. वर्ष 2014 मध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केल्यास 39 जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, वर्ष 2018 मध्ये व्हॅलेंटाइनवरील बंदी हटवण्यात आली होती. यामुळे सौदी अरेबियामध्ये टव्हॅलेंटाइन डेट साजरा करण्यावर कोणतीही बंदी नाही. पण मुस्लीम लोकसंख्या असल्याने येथील नागरिक 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करत नाहीत. 

36
मलेशिया

मलेशियात देखील मुस्लीम लोकसंख्या आहे. वर्ष 2005 मध्ये ‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त एक फतवा जारी करण्यात आला होता. प्रत्येकवर्षी मलेशियात ‘अँटी व्हॅलेंटाइन’ डे साजरा केला जातो.

46
इराण

इराण एक मुस्लीम देश असून येथे ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर बंदी आहे. खरंतर, ‘व्हॅलेंनटाइन डे’ साजरा करण्याची प्रथा पाश्चिमात्य देशांची असल्याचे मानले जाते. याच कारणास्तव इराणमधील धर्मगुरु ‘व्हॅलेंटाइन’ साजरा करणे वाईट मानतात.

56
उझबेकिस्तान

उझबेकिस्तान येथे ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याऐवजी नागरिक आपल्या देशाचे नायक बाबर सम्राटचा जन्मदिवस साजरा करतात. व्हॅलेंटाइन डे साजरा करणे बेकायदेशीर नाही. पण बाबर यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यास सक्त मनाई आहे.

66
इंडोनेशिया

इंडोनेशियात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर बंदी नाही. पण इंडोनेशियातील सुराबया आणि मकसारसारख्या परिसरात कट्टरपंथी मुस्लीम नागरिक राहतात, जे ‘व्हॅलेंनटाइन डे’ साजरा करणे वाईट मानतात. या दिवशी ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त आंदोलनही करतात.

आणखी वाचा : 

प्रेमाचा रंग लाल! 'व्हॅलेंटाइन डे' साठी परफेक्ट आहेत हे Velvet Dress

Valentine दिवशी आलियासारखा चेहऱ्यावर ग्लो हवाय? ट्राय करा हे फेस मास्क

फक्त 50 रुपयांत प्रेयसीला द्या Valentine Day चे खास गिफ्ट

Share this Photo Gallery